
भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी हाती आली आहे. १२ वी पास विद्यार्थ्यांना रेल्वेत नोकरी करण्याची संधी आहे. रेल्वेने १०३६ पदांसाठी अर्ज मागितले होते. या अर्जाची मुदत रेल्वेने वाढवली आहे. यामुळे रेल्वेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोकरीसाठी अर्ज कुठे आणि कसा भरावा, हे जाणून घेऊयात.
रेल्वेच्या नव्या अपडेटनुसार, रेल्वेच्या १०३६ पदांसाठी उमेदवार २१ फेब्रवारीपर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षा फीच्या तारखेतही वाढ केली आहे. रेल्वेने पीजीटी, टीजीटी, चीफ लॉ ऑफिसर, पब्लिक प्रोसिक्यूटर, ज्यूनियर हिंदी ट्रान्सलेटर, लायब्रेरियन आणि प्राथमिक रेल्वे शिक्षकांच्या पदासाठी भरती काढली.
एकूण जागा - १०३६
नोंदणीची सुरुवात - ७-१-२०२५
नोंदणीची शेवटची तारीख - २१-२-२०२५
फी भरण्याची शेवटची तारीख - २२-२-२०२५
अर्ज दुरुस्त करण्याची शेवटची तारीख - २४ फेब्रवारी ते ५ मार्च २०२५ पर्यंत
रेल्वेने एकूण १०३६ पदांसाठी अर्ज मागितले होते. वेगवेगळ्या पदांसाठी वेगळ्या शिक्षणाची अट आहे. काही पदांसाठी संबंधित विषयात पदवी, पदव्युत्तरपर्यंत शिक्षण असणे गरजेचे आहे. शिक्षक भरतीसाठी बीएड, डीएलएलएड किंवा टीईटी परीक्षा पास असणे गरजेचे आहे. तुम्ही अधिक माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर मिळवू शकता.
रेल्वेच्या विविध पदांसाठी खुला गट, ओबीसी आणि ईडब्लूएस वर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये अर्ज शुल्क आहे. तर एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांसाठी २५० रुपये अर्ज शुल्क आहेत. तुम्ही अर्जाची रक्कम डेबिट, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग द्वारे भरू शकता. या व्यतिरिक्त खुला गट आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांचा परीक्षेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर ४०० रुपये रिफंड दिले जातील. तर एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना २५० रुपये रिफंड दिले जातील.
रेल्वेच्या नोकरीसाठी अर्ज भरणारे उमेदवार हे रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकता. वेबसाईटवर लेटेस्ट नोटिफिकेशनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर फॉर्म समोर येईल. त्यात वैयक्तिक माहिती, एज्युकेशन आणि अन्य माहिती भरावी लागेल. सर्व कागदपत्रे भरल्यानंतर शेवटचा पर्याय अर्ज शुल्क भरण्याचा असेल. अर्ज शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.