ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.
या रेल्वेमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात.
तुम्ही अनेकदा रुळांच्या मध्यभागी आणि बाजूला दगड पाहिले असतील पण हे का ठेवले जातात माहितीये का? जाणून घ्या
रेल्वे रुळांच्या खाली काँक्रिटसच्या प्लेट्स असतात. ज्यांना स्लीपर म्हणतात.
रेल्वे रुळावर टाकण्यात येणारे दगड हे रुळावरील गिट्टी (Track Ballast) ट्रॅक बॅलेस्ट असते. ही गिट्टी एका विशिष्ट प्रकारची असते. हे दगड तीक्ष्ण असतात.
रेल्वे सुसाट धावत असताना ट्रॅकवर कंपन होत असते. जर त्या दगडाऐवजी गोल दगड वापरले तर ते एकमेकांवरुन सरकतील आणि आणि रेल्वे ट्रॅक जागेवरुन सरकेल.
अनुकुचीदार दगड एकमेकांना घट्ट पकडून राहतात. आणि ट्रेनचे जड वजन देखील सहन करु शकतात.