
पहलगाम हल्ल्यानंतरचा युट्युबर ज्योती मल्होत्राचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या हल्ला प्रकरणात ज्योती मल्होत्राने पर्यटकांनाच दोषी ठरवलं होतं. हेरगिरी प्रकरणी ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. हिस्सार पोलिसांनी ज्योतीविरोधात कारवाई करत तिला अटक केली आहे. पाकिस्तानसाठी तिने हेरगिरी केल्याचा आरोप आहे.
ज्योती मल्होत्राने पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत पर्यटकांना दोषी ठरवले होते. तिने या व्हिडीओमध्ये सांगितले होते की, 'यामध्ये सरकारचीच नाही तर प्रत्येक नागिरकाची जबाबदारी आहे. जे पर्यटक फिरायला जातात त्यांचे लक्ष असले पाहिजे. जम्मू-काश्मीरमध्ये सगळीकडे ठिकठिकाणी सुरक्षा दल असते. आर्मीचे जवान आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो. तरी देखील ही घटना झाली आहे तर कुठे तरी यामध्ये आपण देखील दोषी आहोत.'
तसंच, 'खरं तर ही गोष्ट आपलं लक्ष नसल्यामुळे झाली. आपण लक्ष दिले पाहिजे, आपण जबाबदारीने वागलं पाहिजे. त्या दहशतवाद्यांना जर कुणी सपोर्ट करत असेल तर आपण भारतीय नाही आहोत. जर आपण करप्ट आहोत, आपण चुकीचे आहोत तर ही गोष्ट कोणत्याही देशासाठी वाईट आहे. जर कुणीपण त्या दहशतवाद्यांना सपोर्ट केला असेल तर ते चुकीचे आहे. याला आपले सरकार जबाबदार आहे. कारण ती सिक्युरीटी कुठे तरी लॅप्स झाली. काही तरी गडबड झाली त्यामुळे ऐवढा मोठा हल्ला झाला.', असं मत ज्योतीने या व्हिडीओमध्ये मांडले होते.
ज्योती मल्होत्राला १७ मे रोजी अटक करण्यात आली. तिला न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप ज्योती मल्होत्रावर करण्यात आला आहे. ज्योती हेरगिरी करत पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आपल्या देशासंबंधी संवेदनशील माहिती पुरवत होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या दानिश या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती, जो तेथील गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होता.
महत्वाचे म्हणजे, पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या इफ्तार पार्टीत ज्योती सहभागी झाली होती. ज्योतीने पाकिस्तानच्या एजंटला आपल्या देशातील सुरक्षा स्थळांची माहिती पुरवल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. तिच्या मोबाईल, लॅपटॉपमधून संशयित माहिती उघड झाली आहे. दरम्यान, ज्योती मल्होत्रा युट्युबर आहे. तिचे ‘ट्रॅव्हल विथ जो’ हे युट्युब चॅनेल आहे. तिचे ३.७७ लाख सब्सक्राइब्स आहेत. तर इन्स्टावर तिचे १.३२ लाख फॉलोअर्स आणि फेसबुकवर ३.२१ लाख फॉलोअर्स आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.