Shocking : ९ मुले, तिघे विवाहित; नातवंडांशी खेळण्याच्या वयात महिला २० वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत पळाली

Shocking News : एक महिला तिच्यापेक्षा २० वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. या महिलेला एकूण ९ मुले आहेत. यातील तिघे विवाहित देखील आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Shocking
Shockingx
Published On
Summary
  • ९ मुलांची आई २० वर्षे लहान प्रियकरासोबत पळाली.

  • पळताना दागिने, रोख रक्कम आणि जमीन कागदपत्रे घेऊन गेली.

  • कोर्टाने महिलेच्या इच्छेनुसार तिला प्रियकरासोबत पाठवले.

Shocking Incident : ९ मुलांची आई तिच्यापेक्षा २० वर्ष लहान प्रियकरासोबत पळून गेली. पळून जाताना ही महिला तिची १० वर्षांची मुलगी आणि जमिनीची कागदपत्रे घेऊन गेली. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करुन कोर्टात तिचा जबाब नोंदवला. मला माझ्या प्रियकरासोबत जायचे आहे, असे महिलेने कोर्टासमोर सांगितले. कोर्टाच्या आदेशांनुसार, महिलेला तिच्या प्रियकरासोबत पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उत्तर प्रदेशामधील उसीहाट पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात घडली आहे. या गावातील एका व्यक्तीने त्याची पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्थानकामध्ये दाखल केली. हा व्यक्ती दिल्लीत मजूर म्हणून काम करतो. त्याची पत्नी गावात मुलांसह राहून शेतीचे काम करते. त्यांना एकूण ९ मुले आहेत. त्यातील ३ मुलांची लग्न झाली आहेत.

Shocking
Student Death in School : रांगेत उभा असताना अचानक खाली कोसळला, शाळेच्या मैदानावर दहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

माझी पत्नी पोलीस स्टेशन परिसरातील नौगवान नासिरनगर येथे एकाच्या घरी जात असे. तेथे तिचा पप्पू नावाच्या एका व्यक्तीशी संपर्क आला. त्यानंतर एका महिन्यापूर्वी माझी पत्नी पप्पूसोबत पळून गेली. बेपत्ता म्हणून तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तिला शोधून काढले, असे त्या व्यक्तीने सांगितले. महिलेला पोलिसांनी तिच्या पतीच्या स्वाधीन केले. पण चार दिवसांनी ती पुन्हा एकदा प्रियकरासह पळून गेली.

Shocking
Nagpur : मध्यरात्री घरात घुसला, तलवारीच्या धाकात अल्पवयीन तरुणीला पळवलं, अन्... नागपुरात भयकंर घडलं!

पोलिसांनी परत त्या महिलेला शोधून काढले आणि तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कोर्टात तिचा जबाब नोंदवला. प्रियकरासोबत जाण्याची इच्छा महिलेने व्यक्त केली. त्यानंतर कोर्टाने महिलेला तिच्या प्रियकरासोबत पाठवून देण्याचे आदेश दिले. घर सोडताना महिलेने तिच्यासोबत तीन लाख रुपये किमतीचे दागिने, ५० हजार रुपये रोख आणि पतीने तिच्या नावावर हस्तांतरित केलेल्या जमिनीचे कागदपत्रे घेतली होती, असा महिलेच्या पतीने आरोप केला आहे.

Shocking
Crime : बंगल्यासाठी डान्सरकडून बीडच्या माजी उपसरपंचाचा घात? मृत्यूनंतर गर्लफ्रेंडचा Video समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com