Nagpur
Nagpursaam tv

Nagpur : मध्यरात्री घरात घुसला, तलवारीच्या धाकात अल्पवयीन तरुणीला पळवलं, अन्... नागपुरात भयकंर घडलं!

Nagpur News : नागपुरातील गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भयंकर प्रकार घडला. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तलवारीच्या धाकात एका तरुणीचे अपहरण केले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Published on
Summary
  • नागपुरात तलवारीच्या धाकावर अल्पवयीन मुलीचे अपहरण.

  • गणेशपेठ परिसरात मध्यरात्रीच्या घटनेने खळबळ.

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून मुलीची केली सुटका.

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nagpur Crime : नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरात तलवारीच्या एका अल्पवयीन मुलीचे तिच्या घरात शिरुन अपहरण करण्यात आले. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तरुणीचे मध्यरात्री पळवून नेले. या घटनेमुळे गणेशपेठ परिसरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री आरोपीने एका तरुणीचे अपहरण केले. तरुणीच्या घरात घुसून तलवारीच्या धाक दाखवला आणि तिला पळवून नेले. आरोपीचा मुलीशी पूर्वी परिचय होता. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. यापूर्वी झालेल्या वादानंतर मुलीने आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

Nagpur
Beed Crime : बीडमध्ये पत्नीकडून पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण, अवघड जागी मार लागल्याने पतीचा मृत्यू

अमित असे अल्पवयीन तरुणीचे अपहरण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी रात्री दोनच्या सुमारास अमित तलवार घेऊन तरुणीच्या आजीच्या घरी पोहोचला. त्याने तलवारीच्या धाकावर तिच्या आजीला धमकावले आणि घरात शिरुन तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्याने आरोपीने तलवारीच्या धाकावर तिला जबरदस्तीने पळवून नेले.

Nagpur
Maharashtra Politics : शिंदे गटाकडून भाजपला 'दे धक्का', बड्या नेत्याचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश

तलवारीच्या धाकावर अल्पवयीन तरुणीचे अपहरण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरु केली. गणेशपेठ पोलिसांनी आरोपी अमितला ताब्यात घेतले आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Nagpur
Student Death in School : रांगेत उभा असताना अचानक खाली कोसळला, शाळेच्या मैदानावर दहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com