

Nitin Gadkari News : आगामी लोकसभा २०२४ निवडणुकीसाठी विरोधकांनी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत पराभूत करण्यासाठी विरोधकांनी रणनिती आखली आहे. अशातच पंतप्रधान मोदींच्या विरोधात उभा राहणारा विरोधी नेता कोण ही चर्चा सुरू असतानाच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं विधान केलं आहे. (Latest Marathi News)
'क्रिकेट, बिझनेस आणि राजकारणात काहीही होऊ शकतं. मात्र, चांगल्या कामामुळे जनता आमच्यासोबत आहे. मोदी सरकारने प्रत्येक क्षेत्रात चांगले काम केले आहे, देशात झालेला बदल हा सरकारच्या कामाचा पुरावा आहे' असं नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटलं आहे. ते एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
नितीन गडकरी यांनी भाजप (BJP) सरकारने केलेल्या कामाचा पाढाच वाचून दाखवला. २०२४ पासून आजपर्यंत भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर जवळपास ५० लाख कोटी रुपयांची काम झाली आहेत. अजूनही काही कामं बाकी आहेत. आमच्या मंत्र्यावर एकही भष्ट्राचाराचा आरोप झाला नाही, असं गडकरींनी ठामपणे सांगितलं आहे. (Maharashtra Breaking News)
दुसरीकडे गडकरींनी आपल्या खात्यावर सुद्धा एकही भष्ट्राचाराचा आरोप झाला नसल्याचं सांगितलं आहे. आम्ही संपूर्णपणे पारदर्शक व्यवस्था केली असून ऑडिट हे खूप महत्वाचे आहे आणि त्याच वेळी परफॉर्मन्स ऑडिट देखील जास्त महत्वाचे आहे, असंही गडकरी म्हणाले.
'लोकसभेसाठी महाविकासआघाडीची रणनिती ठरली'
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागा काबिज करण्यासाठी महाविकास आघाडीची(Mahavikas Aaghadi) रणनिती ठरली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी ठाकरे गट २१, राष्ट्रवादी १९ आणि काँग्रेस ०८ जागा लढवणार असल्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे यामधील मुंबईतील ०६ लोकसभा जागांपैकी ०४ जागा ठाकरे गट लढवेल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी १-१ जागा लढवणार असल्याची माहिती आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.