Maharashtra local body election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? उद्या सुप्रीम कोर्टात होणार फैसला

उद्या होणाऱ्या सुनावणीत निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Supreme Court of India
Supreme Court of IndiaSaam TV
Published On

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कधी होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे भवितव्य ठरवणारी सुप्रीम कोर्टात सुनावणी उद्या अर्थात २१ मार्च रोजी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोरच ही सुनावणी होणार आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीत निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

राज्यातील 92 नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण (Reservation) तसेच महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका या संदर्भात सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीच्या तारखेच्या वेळी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुरू होती.

Supreme Court of India
Political News : 'तुम्हीच वाढवलेली लोकं आहेत...', शिंदे गटाबाबत आदित्य ठाकरे-प्रवीण दरेकरांमध्ये उघड चर्चा

घटनापीठातील सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे या प्रकरणाची सुनावणी करत होते. त्यामुळं या प्रकरणी सुनावणी झाली नव्हती. गेल्या अनेक महिन्यापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. उद्या , २१ मार्च रोजी न्यायालयात राज्य सरकार काय भूमिका घेत यावर होणार फैसला होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या कोरोनामुळे रखडल्या होत्या. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. पुढे सुप्रीम कोर्टात या संबंधीची सुनावणीची तारिख लांबत गेली.

कोरोनाचा काळातही निवडणुका घेण्यात आल्या नाही. त्यात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबतची सुनावणी लांबल्याने निवडणुका कधी होणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Supreme Court of India
Political News: 'CM शिंदेंना उद्धव ठाकरेंच्या द्वेषाची कावीळ झालीये'; ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल

दरम्यान, उद्या सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com