Mumbai News: शिवसेना कार्यकर्त्यांनी दहिसरमध्ये बॅनर लावण्यावरुन भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांपर्यंत तक्रार केली. याच मुद्द्यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि प्रविण दरेकर यांच्यात विधानभवन परिसरात उघड चर्चा झाली.
शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजप कार्यकर्त्यावर कार्यकर्ते विभीषण वारे गंभीर जखमी झाले. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचा मुलगा राज सुर्वे यांचं नाव या प्रकरणात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
आदित्य ठाकरे यांनी प्रवीण दरेकर यांच्याशी या प्रकरणावर विधामंडळ परिसरात चर्चा केली. अशा लोकांवर कारवाई झालीच पाहिजे. महाराष्ट्रात कधीही असा घाणेरडा प्रकार झाला नाही. अशी गुंडागर्दी थांबवली पाहिजे. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का? असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. (Political News)
तुम्ही अशी लोकं वाढवली असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. त्यावर तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. मात्र दोघांनी आपल्या संवादात कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचं बोट आमदार प्रकाश सुर्वेंकडे होतं का अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
शिवसेना आमदारावर गंभीर आरोप
कारण प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर हल्ला झाला आहे, असा आरोप जखमी बिभीशन वारे यांनी केला होता. यापुढे माझ्यावर किंवा माझ्या परिवारावर हल्ला झाला तर यांच्या मागे राज सुर्वे, प्रकाश सुर्वे आणि कौस्तुभ मामुनकर हे तीन जण असतील, असा थेट आरोप बिभीशन वारे यांनी केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.