Political News: 'CM शिंदेंना उद्धव ठाकरेंच्या द्वेषाची कावीळ झालीये'; ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: 'एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंच्या द्वेषाची कावीळ झाली आहे, असं म्हणत विनाय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
Eknath shinde Vs uddhav thackeray
Eknath shinde Vs uddhav thackeray Saam TV
Published On: 

तबरेज शेख

Vinayak Raut News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल खेडच्या गोळीबार मैदानात सभा घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंच्या द्वेषाची कावीळ झाली आहे, असं म्हणत विनाय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

Eknath shinde Vs uddhav thackeray
Sanjay Raut News : संजय राऊतांचं सूचक ट्विट, शिंदे गटातील बडा नेता अडचणीत येणार? चर्चांना उधाण

मुख्यमंत्र्यांच्या सभेला उत्तर देताना विनायक राऊत म्हणाले, ' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्धव ठाकरेंच्या द्वेषाची काविळ झाली आहे. मालेगावची उद्धव साहेबांची सभा एक लाख गर्दीची होणार हे त्यांना दिसणार नाही. फक्त ते पोपटपंची करतात. त्यांची स्वतःची स्क्रिप्ट नाही. कालचे भाषण वाचून दाखवले. त्यामुळे जनसमुदाय निघून गेले. बाळासाहेबांचा उल्लेख आम्ही काय करायचा, बेईमानी लोकांनी शिकवू नये. हिंदूहदय बाळासाहेब हे आमच्या हृदयात आहे'.

'राज्यातील अवकाळी पावसावर भाष्य करताना राऊत म्हणाले, 'अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी सिन्नरला मुख्यमंत्री म्हटले की शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसानभरपाई आम्ही देऊ. कोकणात काल सभा घेतली. इकडून तिकडून लोक जमा केले, असाही आरोप विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला.

Eknath shinde Vs uddhav thackeray
Beed : शेतकऱ्यांनी सांगा जगायचं कसं ? साडेतीन टन कांदा घालून शेतकऱ्यांनाच भरावे लागले 1 हजार 832 रुपये

'तुम्ही सगळीकडे शासकीय विमानाने जाऊन एक तास भाषण करता, लोक उठून जातात पण शेतकऱ्यांच्या बांधावर जायला त्यांना वेळ नाही. शेतकऱ्यांचे पंचनामे पण होत नाहीत मदत कधी करणार ? मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याला वेळ नाही', अशी टीका राऊत यांनी केली.

'किसान मार्च मधील शेतकरी मृत्यू झाला, कुटुंबाना अर्थसाहाय्य ते करू शकले नाही. खोके द्यायला त्यांच्याकडे पैसे आहेत. 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना मदत करा अशी आमची मागणी आहे, असेही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com