Sanjay Raut News : संजय राऊतांचं सूचक ट्विट, शिंदे गटातील बडा नेता अडचणीत येणार? चर्चांना उधाण

एकीकडे संजय राऊत यांच्यावर काय कारवाई होणार, अशी चर्चा सुरू असताना त्यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.
Shivsena Sanjay Raut vs Eknath Shinde Group
Shivsena Sanjay Raut vs Eknath Shinde GroupSaam TV

Sanjay Raut Tweet: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. राऊतांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एका अल्पवयीन लैंगिक अत्याचार पीडितेचा फोटो शेअर केला होता. पीडितेची ओळख जाहीर केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. दरम्यान, एकीकडे संजय राऊत यांच्यावर काय कारवाई होणार, अशी चर्चा सुरू असताना त्यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. (Maharashtra Breaking News)

Shivsena Sanjay Raut vs Eknath Shinde Group
Nitin Gadkari News : PM मोदींना २०२४ मध्ये कोण हरवू शकतं? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

संजय राऊतांनी मंगळवारी सकाळी केलेल्या एका सूचक ट्वीटमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या ट्विटमध्ये संजय राऊतांनी (Sanjay Raut) सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दादा भूसे यांच नाव घेतलं असून भुसे यांनी गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधींचे शेअर्स गोळा केल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.

इतकं करूनही संकेतस्थळावर मात्र, कमी रकमेचे शेअर्स दाखवल्याचा आरोपही राऊत यांनी केला. दादा भुसेंनी १७५ कोटी रूपये एका कंपनीच्या नावानं गोळा केले आहेत. पण त्यांच्या वेबसाईटवर फक्त दीड कोटी दाखवले. त्यावर मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही आणि विरोधकांच्या ५-२५ रूपयांसाठी आतमध्ये टाकलं जातं, असा संताप देखील त्यांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)

दादा भुसेंचा फोटो शेअर करत राऊत ट्वीटमध्ये म्हणतात, “हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्याविरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले गेले. पण कंपनीच्या वेबसाईटवर मात्र फक्त १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स आहेत. तेही फक्त ४८ सभासदांच्या नावावर दाखवण्यात आले आहेत. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल”. राऊतांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

बार्शी प्रकरणात मी काय चुकलो?

दरम्यान, संजय राऊत यांच्यावर बार्शी येथील अत्याचार पीडितेचे फोटो ट्विट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. चुकलो तिच्यावर कोयत्यानं वार झाले आहेत. तिच्या आईने मरणाची इच्छा व्यक्त केलीय. पारधी समाजातील ती मुलगी आहे. अजूनही आरोपी मोकाट आहे. माझ्यावर गुन्हा दाखल होतो ही या राज्याची कायदा सुव्यवस्था कोठ्यावर कशी नाचतेय हे दिसतेय, अशी टीका राऊतांनी केली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com