Beed : शेतकऱ्यांनी सांगा जगायचं कसं ? साडेतीन टन कांदा घालून शेतकऱ्यांनाच भरावे लागले 1 हजार 832 रुपये

कांद्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलंय.
Onion Price
Onion PriceSaam tv
Published On

बीड : कांद्याचे भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. साडेतीन टन कांदा विक्री करून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. उलट अडत व्यापाऱ्याला 1 हजार 832 रुयये देण्याची वेळ बीड मधील एका शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे 70 हजार रुपये खर्च करून कांद्याचा एक रुपयाही पदरात न पडल्याने जीवापाड जपलेल्या कांद्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलंय. त्यामुळं आम्ही जगावं कसं? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)

बीडच्या (Beed) जैताळवाडी गावातील हे आहेत शेतकरी (Farmer) भगवान डांबे.. दोन एकर शेतात त्यांनी कांद्याची लागवड केली होती. महागाचे बियाणे लागवडीचा खर्च खुरपणी फवारणी खते, आणि काढणीचा खर्च सगळं मिळून 70 हजार खर्च आला.. कांदा देखील चांगला निघाल्याने चांगले उत्पन्न मिळेल असे स्वप्न भगवान यांनी पाहिले होते.. कांद्याचा 120 कोण्या भरून सोलापूर मार्केट पाठवला.

चांगला भाव मिळेल त्यातून मुलांचे शिक्षण लग्न घर कुटुंब चालवता येईल, असे स्वप्न शेतकऱ्यांनी पाहिले होते.. मात्र कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरात पडलेल्या पट्टी पाहून धक्काच बसला.. कारण अडत व्यापाऱ्याने आणखी 1 हजार 832 रूपये जमा करा म्हणून सांगितलं.

Onion Price
Govt Employee Strike: संप मिटला! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

गावाकडून पैसे मागवून घेतले. सगळे पैसे देऊन रिकाम्या हाताने शेतकरी घरी आला. त्यावेळी त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून आणि कुटुंब रात्रभर रडलं.. आता कुटुंबाला जगवायचं कसं ? असा प्रश्न शेतकरी कुटुंबासमोर आहे. अशी परिस्थिती बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे.

कांदा उत्पादन करताना तळहाताच्या फोडप्रमाणे पीक जपलं. मात्र एक दिड लाख उत्पन्न होईल, असं वाटलं होतं. शेवटी पदरात काहीच पडलं नाही. अशी प्रतिक्रिया पीडित शेतकऱ्यांना दिली.

लेकरांनी काबाडकष्ट करून कांदा पिकवला त्याला दिवस रात्र मेहनत केली. काढण्यासाठी मजूर मिळत नव्हते तर वयोवृद्ध असून त्यांना मदत करायला आले. खर्च खूप मोठा झाला, मात्र त्याच्या हातात काहीच पडलं नाही.

सोलापूरहून येताना भीक मागून दुसऱ्याकडून पैसे घेऊन माझे लेकरू आलं. आता इकडे तिकडे फिरत आहे. घर कसे चालवावे ? ही विवंचना त्याला सतावत आहे. असं पीडित भगवान डांबे यांच्या आईने सांगितलं.

कांद्याच्या उत्पन्नातून माझं शिक्षण होईल अशी अपेक्षा होती. मात्र कांद्याचे बिल आणि पट्टी पाहिल्यानंतर आम्हाला धक्का बसला उलट अठराशे रुपये अडच व्यापाराला देऊन रिकाम्या हाताने परत यावं लागलं साडेतीन टन कांदा त्यातून एक रुपया मिळाला नसेल तर आम्ही जगायचं कसं सांगा असं शेतकऱ्याच्या मुलाने उपस्थित केला.

दरम्यान, अतिवृष्टी अवकाळी आणि गारपीट या आसमानी संकटाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यासमोर आता सुलतानी संकट उभा राहिला आहे.. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या शेतमाला भाव मिळत नसल्याने, जगावं कसं ? असा असा प्रश्न निर्माण झाला आहे. केलेला खर्च देखील निघत नसल्याने कांदा परवडतच नाही अशी परिस्थिती आहे.

1) सांगा जगायचं कसं .. 3 हजार 100 किलो कांदा विक्री... शेतकऱ्याला पदरमोड करुन भरावे लागले -1 हजार 832

2) हमाली, तोलाई, आणि इतर खर्च, एक रुपयाही उत्पन्न नाही, शेतकऱ्यांनीच भरले 1 हजार 832

3) कांद्याला 50 पैसे भाव.1150 किलो कांद्याचे पैसे आले 775 रु पट्टी.

Onion Price
Sanjay Raut News: संजय राऊत यांचा हक्कभंग समितीवर आक्षेप; थेट विधिमंडळ प्रधान सचिवांना पत्र, वाचा

4)1550 किलो कांदा विक्री केला, त्याचे पैसे येणे तर सोडा पदरचे 1383.85 रू. द्यावे लागलं

5)2011 किलो कांदा घातला असता त्यांना फक्त 2135.20 रुपये पट्टी आली व त्यांना हमाली, तोलाई, आणि इतर खर्च 2583.89 आला. तर 448.69 रुपये पदरचे भरावे लागले.

6) कांद्याला 70 हजार खर्च केला पण रिकाम्या हाताने यावं लागलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com