Political News: ममता बॅनर्जींना एका दिवसात 2 धक्के, खासदाराचा राजीनामा अन् विश्वासू व्यक्तीनं घेतला मोठा निर्णय

BIG SETBACK FOR MAMATA BANERJEE: पश्चिम बंगलाच्या माजी मुंख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अशातच आता दोन जवळच्या नेत्यांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला.
Political News: ममता बॅनर्जींना एका दिवसात 2 धक्के, खासदाराचा राजीनामा अन् विश्वासू व्यक्तीनं घेतला मोठा निर्णय
BIG SETBACK FOR MAMATA BANERJEESaam Tv
Published On
  • पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली

  • माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला

  • तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला

  • तर काही खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र राजकीय भूमिकेसाठी पत्र दिल्याची माहिती समोर

पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यापासून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. एक एक करत अनेक बडे नेते ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला रामराम ठोकत आहेत. अशातच ममता बॅनर्जींना एका दिवसात दोन धक्के बसले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय असलेल्या राज्यसभा खसदार सुष्मिता देव यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर सुष्मिता देव यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतली. त्यांचे फोटो देखील समोर आले आहेत.

सुष्मिता देव यांनी राजीनामा अशावेळी दिला जेव्हा टीएमसीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत आणि अनेक नेते पक्षाची साथ सोडत आहेत. सुष्मिता देव यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे हा टीएमसीसाठी सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. त्यांनी राजीनामा का दिला? यामागची कारणं अद्याप अस्पष्ट आहेत. त्यांनी माध्यमांसोबत येऊन राजीनाम्या मागची कारणं सांगितली नाहीत. सुष्मिता देव या बऱ्याच वर्षांपासून टीएमसी पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होत्या. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर पक्षाच्या वतीने अनेक सक्रिय भूमिका बजावल्या आहेत.

Political News: ममता बॅनर्जींना एका दिवसात 2 धक्के, खासदाराचा राजीनामा अन् विश्वासू व्यक्तीनं घेतला मोठा निर्णय
West Bengal CM: मोठी बातमी! पश्चिम बंगालला मिळाले नवे मुख्यमंत्री, अमित शहांनी 'या' नेत्याच्या हाती सोपवली धुरा

तर दुसरीकडे, टीएमसीच्या विधीमंडळ पक्षामध्ये फूट पडल्यानंतर संसदीय पक्षातही फूट पडल्याचे दिसून येत आहे. सायनी घोष यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत स्वतंत्र व्यवस्थेची मागणी केली आहे. टीएमसीच्या खासदारांनी ओम बिर्ला यांना लिहिलेलेल्या पत्रावर सायनी घोष यांची देखील सही आहे. त्यामुळे हा ममता बॅनर्जी यांच्यासह अभिषेक बॅनर्जी यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

Political News: ममता बॅनर्जींना एका दिवसात 2 धक्के, खासदाराचा राजीनामा अन् विश्वासू व्यक्तीनं घेतला मोठा निर्णय
ठाकरे-पवारांसारखा आणखी एक पक्ष फुटणार, ५० आमदार बंडखोरीच्या तयारीत, राजकारणात खळबळ

सायनी घोष या पश्चिम बंगालमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. त्या सध्या जादवपूर मतदारसंघाच्या खासदार आहेत. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गायलेल्या त्यांच्या 'मेरे दिल में है काबा' आणि 'आँखों में मदिनात' या गाण्यांमुळे बरीच चर्चा आणि वाद निर्माण झाला होता. भाजप नेत्यांनी सायनी घोष यांच्या गाण्यावरून ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले होते आणि त्यांच्यावर मुसलमानांचे तुष्टीकरण केल्याचा आरोप केला होता. पण आता बंडखोर टीएमसी खासदारांनी त्याच भाजपला पाठिंबा जाहीर केला असून सायनी घोषही त्यांच्यात सहभागी झाल्या होत्या.

Political News: ममता बॅनर्जींना एका दिवसात 2 धक्के, खासदाराचा राजीनामा अन् विश्वासू व्यक्तीनं घेतला मोठा निर्णय
West Bengal : पश्चिम बंगालमध्ये खुनी सत्र सुरु, मुख्यमंत्र्यांच्या PA नंतर TMC नेत्याची हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com