मला पदाची लालसा...पश्चिम बंगालमध्ये मतदानानंतर ममतांची पहिली प्रतिक्रिया; भाजप नेत्याचा आश्चर्यकारक दावा

West Bengal Election 2026 Phase 1 Voting Percentage Details: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी मोठा विजयाचा दावा करत राजकीय वातावरण तापवले आहे.
Mamata Banerjee addresses supporters after Phase 1 voting as BJP leader Suvendu Adhikari claims major victory in West Bengal.
Mamata Banerjee addresses supporters after Phase 1 voting as BJP leader Suvendu Adhikari claims major victory in West Bengal.saam tv
Published On

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी मतदान पार पडले. राज्यातील 152 जागांसाठी रेकॉर्ड ब्रेक मतदान पार पडले असून बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच 90 टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचा थेट सामना होत असून प्रचारावेळी बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या विक्रमी मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुवेदु अधिकारी यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यातील भाजपच्या कामगिरीबद्दल मोठा दावा केला आहे.

Mamata Banerjee addresses supporters after Phase 1 voting as BJP leader Suvendu Adhikari claims major victory in West Bengal.
माजी मुख्यमंत्र्यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

सुवेंदू अधिकारी काय म्हणाले?

पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील भाजपच्या कामगिरीबद्दल सुवेंदू अधिकारी म्हणाले, निवडणूक आयोगाने निवडणुका अत्यंत शांततेत पार पडल्या. माझ्या माहितीनुसार, ९०% मतदान झाले आहे. आम्ही पहिल्या टप्प्यात १२५ जागा जिंकू. मुस्लिम मते आधीच एकवटली होती, पण निकालानंतर तुम्हाला दिसेल की ८५% हिंदू भाजपसोबत असतील. दुसरा टप्पा आमच्यासाठी अवघड नाही. आम्हाला फक्त गुंडगिरीवर नियंत्रण मिळवायचे आहे. पहिल्या टप्प्यात निवडणूक आयोग १००% उद्दिष्ट साध्य करू शकला आहे.

Mamata Banerjee addresses supporters after Phase 1 voting as BJP leader Suvendu Adhikari claims major victory in West Bengal.
रेकॉर्डब्रेक मतदान! पश्चिम बंगालमध्ये ९० टक्के व्होटिंग; सत्ता बदलणार की ममता बॅनर्जी पुन्हा येणार?

पश्चिम बंगालमधील १५२ मतदारसंघांसाठी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली, तेव्हाच मतदार केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदार यायला सुरुवात झाली. कडक्याचे ऊन असूनही लोकांचा उत्साह जराही कमी झाला नाही. यावर्षी निवडणूक आयोगाने बंगालमधील निवडणुकांसाठी अभूतपूर्व व्यवस्था केली आहे. दोन लाखांहून अधिक सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून याचा मतदानावर झालेला परिणाम दिसून येतो. बंगालमधील मतदान शांततेत पार पडत आहे, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले.

Mamata Banerjee addresses supporters after Phase 1 voting as BJP leader Suvendu Adhikari claims major victory in West Bengal.
Uttarakhand Accident: अंत्यविधीवरून घरी परतताना भीषण अपघात; खोल दरीत जीप कोसळून ८ जणांचा मृत्यू

मला फक्त केंद्रातील भाजपचा अंत हवा - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी म्हणाल्या, जनतेचा कल पाहता आणि आतापर्यंतचे मतदान बघता, आम्ही विजयाच्या उंबरठ्यावर आहोत. त्या पुढे म्हणाल्या, मला कोणत्याही पदात रस नाही, मला फक्त केंद्रातील भाजप सरकारचा अंत हवा आहे. कोलकाताच्या बो बाजार भागातील एका सभेत ममता म्हणाल्या की, निवडणूक जिंकल्यानंतर त्या सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणतील आणि दिल्लीवर केंद्रीय सत्तेवर विजय मिळवतील. अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com