माजी मुख्यमंत्र्यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Former Andhra Pradesh CM N Bhaskara Rao Death News: आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन भास्कर राव यांचे वयाच्या 90 व्या वर्षी हैदराबादमध्ये निधन झाले आहे.
Former Andhra Pradesh Chief Minister N. Bhaskara Rao passes away at 90; last rites performed in Hyderabad.
Former Andhra Pradesh Chief Minister N. Bhaskara Rao passes away at 90; last rites performed in Hyderabad.saam tv
Published On

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन भास्कर राव यांचं बुधवारी 22 एप्रिल रोजी निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. हैद्राबाद येथील कॉन्टीनेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. एन भास्कर राव यांचे पार्थिव जुबिली हिल्स येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर पुंजागुट्टा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.

Former Andhra Pradesh Chief Minister N. Bhaskara Rao passes away at 90; last rites performed in Hyderabad.
Uttarakhand Accident: अंत्यविधीवरून घरी परतताना भीषण अपघात; खोल दरीत जीप कोसळून ८ जणांचा मृत्यू

एक महिन्यासाठी होते मुख्यमंत्री

एन भास्कर राव यांचा जन्म 23 जून 1935 रोजी गुंटुर इथे झाला होता. त्यांनी उस्मानिया विद्यापिठातून कायद्याची पदवी घेतली होती. 1978 मध्ये काँग्रेस पक्षातून आमदार म्हणून निवडून आले होते. 1984 मध्ये त्यांनी अविभाजीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून एका महिना कारभार सांभाळला होता.

Former Andhra Pradesh Chief Minister N. Bhaskara Rao passes away at 90; last rites performed in Hyderabad.
Crime: बायकोचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, डोक्यात सिलिंडर घालत नवऱ्याने जागीच संपवलं

मारी चेन्ना रेड्डी आणि टी. अंजय्या यांच्या मंत्रिमंडळाने एन भास्कर राव यांनी मंत्री म्हणून काम केले होते. 1982 मध्ये जेव्हा एन.टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली. तेव्हा एन भास्कर राव यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. 1983 च्या निवडणुकीत तेलगू देसम पक्षाने प्रचंड विजय मिळवल्यानंतर त्यांनी एनटीआर मांत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून ही काम पाहिले. तसेच 1998 मध्ये खासदार झाले. 2019 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कमळ हाती घेतले. एन भास्कर यांचे पुत्र मनोहर आंध्रप्रदेशचे नागरी पुरवठा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com