मतदानाच्या दिवशी मोठा राडा; भाजप उमेदवाराला पळवून मारलं, कार फोडली

west bengal bjp candidate beaten : पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दिवशी मोठा राडा झाला आहे. भाजप उमेदवाराला पळवून पळवून मारल्याची घटना घडली आहे.
west bengal latest news
west bengal bjp candidate beatenSaam tv
Published On
Summary

पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दिवशी हिंसाचार

भाजप उमेदवाराला बेदम मारहाण

भाजप उमेदवाराच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानावेळी काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. एकीकडे मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने मतदार पोहोचत आहेत. तर दुसरीकडे मतदान केंद्राजवळ हाणामारी, तोडफोडीच्या घटना घडताना पाहायला मिळत आहे. तर एका ठिकाणी टीएमसी कार्यकर्त्यांनी थेट भाजप उमेदवारालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पश्चिम बंगालमध्ये उडाला हिंसाचाराचा भडका

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद, कूचबिहार, सिलिगुडी आणि मालदा भागात हिंसाचाराचा भडका उडाला आहे. मुर्शिदाबादमध्ये उमेदवार हुमायू कबीर यांच्या कारची तोडफोड केली आहे. मुर्शिदाबादमध्ये हिंसाचाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. AJUP प्रमुख आणि रेजीनगरचे उमेदवार हुमायूं कबीर यांच्या ताफ्यावर काही जणांनी वीट आणि लाठीकाठ्यांनी हल्ला केला आहे. यावेळी टीएमसी आणि एजेयूपी कार्यकर्ते भिडले. या हिंसक घटनेमुळे कबीर यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यांनी हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

कूचबिहारचे तूफानगंज भागातही हिंसाचाराचा भडका उडाला आहे. हिसांचारानंतर मतदारसंघातील परिस्थिती तणावपूर्ण झाली. परंतु सीएपीएफच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. काही लोक मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपानंतर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जवानांना तैनात करण्यात आलं आहे.

भाजप उमेदवाराला बेदम मारहाण

दक्षिण दिनाजपूरच्या कुमारगंज विधानसभा मतदारसंघातूनही धक्कादायक घटना घडली आहे. भाजप उमेदवार सुवेंदू सरकार यांना कथित तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी हल्ला केला आहे. एका मतदान केंद्रावर गुंडांनी केंद्रावर गर्दी केली असल्याची माहिती सुवेंदू सरकार यांना मिळाली. त्यानंतर सुवेंदू सरकार आणि त्यांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी कथित समर्थकांनी त्यांच्यावर लाठीकाठ्यांनी हल्ला केला. 'पोलिसांच्या उपस्थित टीएमसीच्या गुंडांनी हल्ला केलाय, असा आरोप सुवेंदू सरकार यांनी केला. सुवेंदू सरकार यांच्या आरोपानंतर अद्याप टीएमसी पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com