Weather Update: धडकी भरवणारं ७० किमी वेगाचं वादळ अन् मुसळधार पाऊस; २० राज्यांसाठी IMD चा अलर्ट

Weather Update IMD Issues Alert : भारतीय हवामान विभागाने २० राज्यांसाठी दोन दिवसांचा इशारा देण्यात आलाय. यात मुसळधार पाऊस, मेघगर्जना, धुळीची वादळे येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
Weather Update  IMD Issues Alert :
IMD ALERT: 70 KMPH WINDS AND HEAVY RAIN LIKELY IN 20 STATES OVER NEXT TWO DAYSsaam tv
Published On
Summary
  • आयएमडीने पुढील दोन दिवसांसाठी 20 राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे

  • ताशी 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

  • मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि धुळीच्या वादळांचा इशारा देण्यात आला आहे.

देशभरातील हवामानात विविधता दिसून येत असून काही भागांत थंडीची लाट तर काही भागांत उष्णतेचा प्रभाव जाणवून येत आहे. मान्सून, मान्सूनपूर्व हालचाली आणि 'एल निनो' (El Niño) यांचा हवामानावर परिणाम होत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील दोन दिवसांत २० राज्यांमध्ये पावसासह धुळीची वादळे येण्याचा इशारा दिला आहे.

Weather Update  IMD Issues Alert :
राज्यात मान्सून लांबणीवरच! महाराष्ट्रात कधी सक्रिय होणार मान्सून, पुणे हवामान वेधशाळेचा अंदाज काय?
Weather Update  IMD Issues Alert :
राज्यात मान्सून लांबणीवरच! महाराष्ट्रात कधी सक्रिय होणार मान्सून, पुणे हवामान वेधशाळेचा अंदाज काय?

आयएमडीनुसार मान्सूनने ४ जून ते १५ जूनपर्यंत १९ राज्यापर्यंत मान्सूननं मजल मारली आहे. तर इतर राज्यात अजून पूर्व-मान्सून पाऊस होतोय. पुढील ४८ तासात मान्सून मध्य प्रदेशात पोहोचेल अशी शक्यता आहे. ५ जुलैपर्यंत मान्सून पूर्ण उत्तर-पश्चिम भारतात पोहोचेल त्यानंतर दोन महिन्यापर्यंत सक्रिय असेल.

Weather Update  IMD Issues Alert :
Heat Wave In Vidarbha: 'हॉट' विदर्भ! अनेक जिल्ह्यातील तापमान 45 पार; हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सून आतापर्यंत कोण-कोणत्या राज्यात पोहोचलाय?

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनने केरळ, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय, सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये प्रगती केली आहे. ५ जुलैपर्यंत मान्सून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड आणि राजस्थानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

'या' राज्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस

हवामान विभागानुसार उत्तर प्रदेशाच्या २१ शहरांमध्ये वादळ येणार असल्याचा इशारा देण्यात आला. जवळपास ६० ते ७० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजस्थानमधील बिकानेर, जयपूर, भरतपूर, अजमेर, कोटा आणि जोधपूर येथे पुढील चार दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १५ जूनपासून हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात धूळीची वादळे आणि पावसासाठी 'येलो अलर्ट'ची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज बिहारमधील १२ जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आलाय.

१६ जूनला 'या' राज्यात पावसाचा अलर्ट

राजस्थानमधील बिकानेर, जयपूर, भरतपूर, अजमेर, कोटा आणि जोधपूर येथे पुढील चार दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. १५ जूनपासून हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात धूळीची वादळे आणि पावसासाठी 'येलो अलर्ट'ची शक्यता आहे. तसेच आज बिहारमधील १२ जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आलाय.

या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, बुधवारी १७ जून रोजी सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये ताशी ४० ते ६० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. झारखंड आणि ओडिशामध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com