राज्यात मान्सून लांबणीवरच! महाराष्ट्रात कधी सक्रिय होणार मान्सून, पुणे हवामान वेधशाळेचा अंदाज काय?

Maharashtra Monsoon: महाराष्ट्रातील मान्सून पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. मुंबई आणि राज्यातील अनेक भागांत मान्सून सक्रिय होण्यासाठी २० जूनपर्यंत वाट पाहावी लागू शकते, असा अंदाज पुणे हवामान केंद्र आणि भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
Maharashtra Monsoon:
MAHARASHTRA MONSOON DELAYED: WHEN WILL MONSOON BECOME ACTIVE? PUNE WEATHER OFFICE ISSUES NEW FORECASTsaam tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्यास अजून ५ ते ६ दिवसांचा विलंब

  • मुंबईसह राज्याच्या अनेक भागांना २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

  • उत्तर भारतातील गरम आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनचा प्रवास थांबला

महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा अजूनही कायम असून सक्रीय होण्यास अजून ५ ते ६ दिवसांचा विलंब लागणार आहे. पुणे हवामान वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यास अजून अनुकूल वातावरण नाहीये. पुढील २४ ते ४८ तासांत राज्याच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.

Maharashtra Monsoon:
Monsoon Update : राज्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम, 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट; वाचा हवामान अंदाज

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, तो मुंबईसह उर्वरित राज्यात दाखल होण्यासाठी २० जूनपर्यंत वाट पाहावी लागेल, असा नवा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून मध्य महाराष्ट्रातच अडखळला आहे. उत्तर भारतातील उष्ण वाऱ्यांनी त्याचा प्रवास थांबला. त्यामुळे राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे.

Maharashtra Monsoon:
El Niño : मान्सून का रेंगाळला? 'एल निनो'चा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? पुण्यात पाऊस कधी कोसळणार? पाहा IMD चा अंदाज

विदर्भात पारा पुन्हा ४३ अंशांवर आहे.गरम व कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची वाटचाल रोखली गेली असून, या कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाला की, मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये मान्सून दाखल होण्यासाठी आता थेट २० जून उजाडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मान्सूनने हैदराबाद, ओडिशाच्या किनारपट्टी भागात, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागात वाटचाल केली असून महाराष्ट्रात मात्र मान्सून पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील काही भागात अजूनही मान्सून सक्रिय झालेला नसून काही भागात वादळी पावसाची नोंद होत आहे. अशी माहिती हवामान वेधशाळेचे शास्त्रज्ञ एसडी सानप यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com