Heat Wave In Vidarbha: 'हॉट' विदर्भ! अनेक जिल्ह्यातील तापमान 45 पार; हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा

Heat Wave In Vidarbha: महाराष्ट्रात तापमानवाढीचा उच्चांक गाठत आहे. विदर्भात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे वर्धा, अकोला आणि अमरावतीला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Vidarbha heatwave latest temperature update
Vidarbha heatwave latest temperature updatesaam tv
Published On

विदर्भात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा पार केला आहे. येथील नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. आज ब्रह्मपुरी हे विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलं आहे. येथे तब्बल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर 46.8 अंशांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर नागपूरमध्ये 46 अंश तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचे चित्र आहे.

Vidarbha heatwave latest temperature update
Weather Update: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, उष्णतेचे आतापर्यंतचे रेकॉर्ड मोडीत निघणार; ६ जिल्ह्यांना रेड अलर्ट

अमरावतीमध्ये 45.8, गडचिरोली आणि वर्धा येथे 46.4, गोंदिया 45.2, यवतमाळ 45 आणि भंडारा 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे. अकोला 44.9 अंशांवर पोहोचलं असून बुलढाणा आणि वाशीममध्येही उष्णतेचा तडाखा कायम आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस विदर्भात ‘हीट वेव्ह’ कायम राहण्याचा इशारा दिला आहे.

Vidarbha heatwave latest temperature update
Weather Update: चक्रीवादळाचं संकट! १३ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कसं असेल हवामान? पाहा IMD चा अलर्ट

त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील तीन जिल्ह्यांना तापमानवाढीचा रेड अलर्ट देण्यात आलाय. तर काही काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रेड अलर्टमुळे तापमानातवाढीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

"आता प्रतिचक्रवाती परिस्थितीमुळे सर्वसाधारणपणे तापमान वाढू लागले आहे. पण आता तशी परिस्थिती नाही. विदर्भाचे जे रिजन आहे, तिकडे आद्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. आकाश निरभ्र आहे. अशा परिस्थितीत सूर्यकिरण जास्त तीव्रतेने येतात, हे एक कारण तापमानवाढीसाठी आहे", अशी माहिती हवामान तज्ज्ञ सानप यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com