महाराष्ट्रात पुढील ५ दिवस महत्वाचे
विदर्भात तापमान ४७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
वर्धा, अकोला, अमरावती जिल्ह्यांना रेड अलर्ट
महाराष्ट्रात पाऊस आणि उष्णतेचा इशारा
हवामान विभागाचा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा
राज्यामध्ये सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमुळे उष्णतेचा कहर सुरू आहे. तर काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पाऊस झोडपून काढत आहे. अशामध्ये राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे असणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकणार आहे. या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राला वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे.
नागपूरचे हवामान शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीव्र उष्णतेमुळे होरपळणाऱ्या विदर्भाला तूर्तास दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पुढील ३ ते ५ दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वर्धा, अकोला आणि अमरावती जिल्हांना उष्णतेचा रेडअलर्ट जारी करण्यात आला आहे. यवतमाळ, नागपूर, चंद्रपूरला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उष्णतेचे सर्व रेकॉड मोडीत निघण्याची भीती आहे.
विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान समान्यापेक्षा अधिक राहिल. समुद्रपासून चक्रीवाद बनला आहे. त्यात हवा ड्राय आहे. ढगाळ वातावरण नसल्यानं तापमान वाढले. पुढील पाच ते सहा दिवस असे तापमान असेल. मागील १० वर्षांत सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. ४५ ते ४७ अंश डिग्री सेल्सिअस तापमान जाणार आहे. संपूर्ण भारतात तापमानाच्या बाबतीत विदर्भ दुसऱ्या नंबरवर राहील. मार्च मे या काळात तापमानात वाढ झालेली असेल.
२०१३ साली नागपूरचे मे महिन्यात तापमान ४७.९ अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते. त्या दिशेने सध्या पारा चढत आहे. हिट वेव्हचे दिवस वाढले आहे. ९ ते १० महिन्याभरात हिट वेव्ह पाहायला मिळत आहे. पुढील सात दिवस मोठा बदल दिसणार नाही. अशाच पद्धतीचा तापमान पाहायला मिळेल. काही शरण जिल्ह्यामध्ये तापमानात वाढ होण्यची शक्यता आहे. तापमानातून कोणता दिलासा दिसत नाही. जुने रेकॉर्ड तुटतीलच असं नाही. मात्र तापमान हे सर्वाधिक पाहायला मिळेल.
दरम्यान, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका वाढला आहे. तर दुसरीकडे काही जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी ४०-५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.