Weather Update : ४ दिवस १३ राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा आजचा हवामान अंदाज

IMD Weather Alert News : देशभरात उष्णतेच्या लाटेनंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. IMD च्या अंदाजानुसार अनेक राज्यांत पुढील काही दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असून महाराष्ट्रातही लवकरच मान्सून दाखल होणार आहे.
MONSOON ARRIVAL UPDATE: IMD PREDICTS RAINFALL RELIEF ACROSS INDIA
MONSOON ARRIVAL UPDATE: IMD PREDICTS RAINFALL RELIEF ACROSS INDIASaam Tv
Published On
Summary
  • देशभरात उष्णतेची तीव्र लाट

  • IMD ने अनेक राज्यांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला

  • ३-४ दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस

  • महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीला मान्सून आगमन अपेक्षित

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गेले काही दिवस उकाड्याने नागरिक हैराण झाले. देशाची राजधानी दिल्ली येथे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले, तर उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात तब्बल ४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अशातच आता नागरिकांना दिलासा देणारी बातमी हवामान खात्याने दिली आहे. IMD च्या ताज्या अंदाजानुसार, लवकरच मान्सून दाखल होणार असून अनेक राज्यांत पुढील ३-४ दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे.

हवामान विभागाने बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये २१ ते २३ मे दरम्यान पावसासोबतच सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमध्ये २० ते २६ मे दरम्यान विविध जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. झारखंडमध्येही २१ ते २६ मे या कालावधीत पावसाचा अंदाज असून, ओडिशामध्ये २२ ते २४ मे दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

MONSOON ARRIVAL UPDATE: IMD PREDICTS RAINFALL RELIEF ACROSS INDIA
MLC Election : धाराशिव-बीड-लातूर विधानपरिषद निवडणूक जाहीर; भाजपकडून कुणाला मिळणार तिकीट? ही ३ नावे चर्चेत

वायव्य भारतातही हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसत असून, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागांमध्ये २१ ते २३ मे दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. दक्षिण भारतातही पावसाची सक्रियता वाढणार असून, तामिळनाडू, पुदुचेरी, केरळ, माहे आणि कराईकल येथे २१ ते २४ मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

MONSOON ARRIVAL UPDATE: IMD PREDICTS RAINFALL RELIEF ACROSS INDIA
Shocking : भयंकर! पत्नीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या पतीने काढला काटा; रात्रभर मृतदेहाशेजारी बसला

महाराष्ट्रात देखील येत्या ५ ते ६ जून दरम्यान मान्सून दाखल होणार आहे. तसेच वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये तपमानात वाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबईतील वातावरण ३४ अंश सेल्सिअसवर आले असून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

MONSOON ARRIVAL UPDATE: IMD PREDICTS RAINFALL RELIEF ACROSS INDIA
Electricity Saving Tips : उन्हाळ्यात सतत AC चालवला तरी वीजबिल येईल कमी? वापरा या ट्रिक्स

तेलंगणामध्येही विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. एकीकडे उष्णतेची लाट त्रास देत असताना, दुसरीकडे पावसाचा हा अंदाज नागरिकांसाठी काहीसा दिलासादायक ठरत आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com