बॅंन्ड बाजा बारात! ना घोडा, ना गाडी, भावाने काढली थेट जेसीबीमधून वरात; Video होतोय तुफान व्हायरल

चर्चा तर होणारचं! घोडा,गाडी नव्हे थेट जेसीबीमधून निघाली लग्नाची वरात व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video Gujrat
Viral Video GujratSaamtv

Gujrat: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा आणि आनंदाचा दिवस. हा दिवस खास आणि अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकजण हटके फंडे अवलंबत असतो. कोणी आपल्या लग्नात धमाकेदार डान्स करताना दिसतं, तर कोणी थाटात बुलेटवरुन एन्ट्री घेतो.

पण सध्या एका लग्नाच्या आगळ्या वेगळ्या वरातीची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. या जोडीने आपल्या लग्नाची वरात थेट जेसीबीमधून काढली आहे. (Viral Video)

Viral Video Gujrat
Shinde-Fadnavis Government: विधान परिषद निवडणुकांनंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांमध्ये धुसफूस?

आत्तापर्यंत तुम्ही सजवलेल्या गाडीमधून, घोड्यावरुन लग्नाची वरात निघालेली पाहिली असेल. पण लग्नाची वरात थेट जेसीबीमधूनच काढल्याची बातमी समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला नवरदेवाचा व्हिडिओ नवसारी येथील कालियारी गावातील आहे.

आदिवासी धोडिया समाजातील केयुर पटेल यांनी जेसीबीवरून स्वत:च्या लग्नाची मिरवणूक काढली. त्याला त्याच्या लग्नात काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. त्यामुळेच खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबीवरून त्याने स्वत:च्या लग्नाची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला.

Viral Video Gujrat
Viral Video : तुफान राडा! नाशकात तरुणींमध्ये जोरदार हाणामारी; एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या

बघ्यांची गर्दी...

एखाद्या वाहनाप्रमाणे जेसीबी पूर्णपणे फुलांनी सजवण्यात आला होता. ढोल वाजवण्याबरोबरच डीजे घेऊन निघालेली ही मिरवणूक वधूच्या घरी पोहोचली. नवरदेवाची ही आगळीवेगळी मिरवणूक पाहून स्थानिकांसह वराडी मंडळीही चकित झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही जबरदस्त वरात पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.

सध्या या आगळ्या वेगळ्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. प्रत्येकजण गाडी घेऊन येतात, तर, काही जण घोड्यावर बसून येतात. पण मला काहीतरी वेगळे करायचे होते, म्हणून मी माझ्या लग्नात जेसीबी आणला, असे लग्न करणाऱ्या नवरदेवाने याबद्दल बोलताना सांंगितले आहे. (Gujrat News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com