
भारत पाकिस्तान तणाव वाढल्याने सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. त्यांना कामावर रुजी होण्याचे आदेश देण्यात आले. ड्युटीवर जाण्याऱ्या जवानांशी ट्रेनमध्ये गैरवर्तन झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इंदोरहून जम्मूला ट्रेनने जाणाऱ्या सैनिकांनी 'टीटीआयने आमच्याकडून लाच मागितल्याचा आरोप केला आहे. टीटीआय आणि सैनिकांचा भांडण करतानाचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर टीटीआयला निलंबित करण्यात आले आहे. सुभेदार विनोद कुमार यांनी घडलेला प्रकार माध्यमांना सांगितला.
सुभेदार विनोद कुमार यांनी सांगितले की, 'बुधवारी (८ मे) रात्री १० वाजता रजा रद्द झाली असून तातडीने आम्हाला जम्मूला पोहोचायचे आहे, असा संदेश मिळाला. त्यांनतर मी ११ वाजता रेल्वे स्थानकावर पोहोचलो. इंदोरहून जम्मूला जाणाऱ्या मालवा एक्स्प्रेसमध्ये चढलो. अचानक निघाल्याने रिझव्ह तिकीट काढता आले नाही. मी जनरल तिकीट काढून एस१ कोचमध्ये चढलो आणि रात्रभर एका रिकाम्या सीटवर झोपलो.'
'शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास ट्रेन जेव्हा सोनीपत-पानिपत दरम्यान जात होती. दलजित सिंग नावाचा टीटीआय आला. माझ्या सीटजवळ अग्नीवीर झहीर खान आणि हवालदार राजकुमार भदौरिया होते. टीटीआयने झहीरकडे तिकीट मागितले. तेव्हा त्याने जनरल तिकीट दाखवले. त्यावरुन टीटीआयने दंड भरावा लागेल असे म्हटले. आम्ही सैनिक आहोत, तातडीने जम्मूला बोलावले आहे असे म्हणत झहीरने ओळखपत्र दाखवले. टीटीआयने झहीरकडून १५० रुपये घेतले आणि तो निघून गेला', असे विनोद कुमार म्हणाले.
'१५० रुपयांचा दंड घेतल्यानंतर टीटीआयने पावती देण्यास नकार दिला. त्याने माझ्याकडूनही लाच मागितली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने मला जनरल डब्यात जाण्यास सांगितले. लांबचा प्रवास करतोय, जम्मूला जाऊन ड्युटी करायची आहे, असे सांगूनही टीटीआयने माझे ऐकले नाही. राजकुमार भदौरिया यांच्याशीही त्याने गैरवर्तन केले', अशी माहिती विनोद कुमार यांनी दिली. टीटीआय दलजित सिंगला निलंबित करण्यात आले असून या प्रकरणावर चौकशी सुरु असल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.