

उत्तराखंडच्या चंपावतमधून धक्कादायक घटना उघडकीस
पोलीस कर्मचाऱ्याचा व्यायाम करताना मृत्यू
पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ
उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यातील बनबासामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्याचा व्यायाम करताना तब्येत बिघडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोग्याविषयी नेहमी सजग राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस कर्मचाऱ्याचा व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर मृत पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे कारण समोर येईल. उत्तराखंडच्या पोलीस विभागातील विशेष कृती गटात हा जवान कार्यरत होता. गिरीश भट्ट असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय गिरीश भट्ट हे शुक्रवारी सांयकाळी जवळपास ४ वाजता व्यायामशाळेत पोहोचले. व्यायाम सुरू करून ५ मिनिटे झाल्यानंतर गिरीश हे जमिनीवर कोसळले. व्यायामशाळेतील मित्रांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. व्यायामशाळेजवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. गिरीश भट्ट हे मूळचे पिथौरागड जनपद येथील रहिवासी होते. ते २००६ साली उत्तराखंड पोलीस दलात भरती झाले. ते सध्या टकनपूर येथील कार्यालयात विशेष कृती गट जवान म्हणून तैनात होते.
सहकाऱ्यांच्या मते, गिरीश हे आरोग्याविषयी जागरूक होते. ते सलग तीन वर्षांपासून व्यायाम करत होते. त्यांच्या मृत्यूने भट्ट कुटुंब आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. गिरीश भट्ट यांच्या जाण्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या सहकाऱ्यांकडून सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.