नाशिकमध्ये कपडे वाळत घालताना महिलेचा शॉक लागून मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ

nashik News : नाशिकच्या सटाणामध्ये कपडे वाळत घालताना महिलेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने सटाणा परिसरात हळहळ व्यक्त येत आहे.
nashik news
nashik newsSaam tv
Published On
Summary

नाशिकमध्ये शॉक लागून महिलेचा मृत्यू

महिलेच्या मृत्यूने सटाणा परिसरात हळहळ

धाराशिवमध्येही शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिकच्या सटाणा शहरातील अहिल्या देवी चौकातील ४० वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. महिलेसोबत सकाळी साडे दहा वाजता ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोनाली अरविंद सोनवणे असे शॉक लागून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सोनाली या नेहमीप्रमाणे कपडे वाळत घालत असताना अचानक त्यांना विजेचा शॉक लागला. त्यानंतर त्या जागीच कोसळल्या. यात सोनाली यांचा जागीच मृत्यू झाला.

nashik news
Mumbai Crime News: किरकोळ कारणावरून जोडप्यात वाजलं; वादातून पतीनं पत्नीच्या पोटात लाथ मारली अन्... होत्याचं नव्हतं झालं

सोनाली यांना शॉक लागल्यानंतर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निलेश पाकळे आणि समाधान सोनवणे यांनी तत्काळ त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा तपास केला. त्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

मृत सोनाली यांच्या पश्चात पश्चात पती, सासू, दिर, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

धाराशिवमध्ये युवा शेतकऱ्याचा मृत्यू

शेतात काम करत असताना विजेच्या धक्क्याने युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील खंडाळा येथे ही घटना घडली आहे. विद्युत खांबावरील तारेचा स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने नामदेव गौतम जाधव या चाळीस वर्षीय शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

nashik news
Crime News: ४० कोटींचा जमीन व्यवहार; वादानंतर महिला वकिलाची आत्महत्या, ज्येष्ठ वकील आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल

घरातील कर्ता पुरुष अकाली गेल्याने कुटुंब उघड्यावर आलं आहे. नामदेव जाधव यांच्या पश्चात पत्नी मुलं आई-वडील असं कुटुंब आहे. ऊसामध्ये पूर्व मशागतीची काम करत असताना खत टाकत असताना विजेच्या तारेला स्पर्श झाला. त्यामुळे शेतकरी जाधव यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com