Uttar Pradesh News: नवरा फॉरेन रिटर्न, नवरी इंजिनियर, धूमधडाक्यात लग्न ठरलं; पण मंगलाष्टक सुरू होण्यापूर्वीच मोडलं, नेमकं काय घडलं?

Uttar Pradesh Shocking News: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या दिवशी सप्तपदीच्या आधी नवरा- नवरीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर त्यांचे लग्न मोडले. हे लग्न का मोडले यामागचे कारण जाणून घ्या.
Uttar Pradesh News
Uttar Pradesh NewsSaam Tv
Published On

लग्न म्हणजे नवरा- नवरीच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. त्यासाठी मेहंदी, संगीत हळद असे सगळे समारंभ केले जातात. परंतु हे सर्व कार्यक्रम झाले असून सप्तपदीच्या वेळी नवरा- नवरीमध्ये भांडण झाले तर. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

हळद, मेहंदी सर्वकाही थाटामाटात पार पडले. परंतु सप्तपदीच्या वेळी वधू-वरांच्या कुटुंबियांचा वाद झाला. यानंतर त्यांचे लग्न मोडल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Uttar Pradesh News
Arvind Kejriwal Bail: ब्रेकिंग! CM अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन; पण मुक्काम जेलमध्येच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरी आणि तिच्या भावाने नवऱ्याच्या कुटुंबियांनी ५० लाख रुपयांचा हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. तर नवऱ्याच्या कुटुंबियांनी हे आरोप फेटाळत या भांडण्यासाठी नवरीच्या कुटुंबियांना जबाबदार ठरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवरा परदेशात नोकरी करतो तर मुलगी इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. या दोघांमध्ये हुंडा देण्यावरुन वाद झाला आहे. गुरुवारी ही घटना घडली आहे. वधू- वराच्या कुटुंबियांमध्ये रात्री उशिरापर्यंत भांडण सुरु होते, असं पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना झाशी शहरातील कोतवाली भागातील आहे. या ठिकाणी गुरुवारी रात्री लग्नसमारंभ होते. परंतु सप्तपदीच्या आधीच नवरा- नवरीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण एवढं मोठे होते की पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. या दोन्ही कुटुंबाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला,परंतु वधूने लग्न करण्यास नकार दिला. तर वराच्या कुटुंबियांनी ५० लाख रुपये हुंडा द्या मग हे लग्न होईल असं सांगितले. याआधी तर नवऱ्याच्या कुटुंबाकडून १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, असं सांगण्यात येत आहे.

Uttar Pradesh News
Nepal Landslide: नेपाळमध्ये पावसाचा कहर! भूस्खलनानंतर प्रवाशांनी खचाखच भरलेल्या २ बस नदीत वाहून गेल्या, ६० जण बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचे काही विधी सुरु झाले होते. परंतु हुंड्याचे पैसे न दिल्यास नवरदेवाची मिरवणूक पुन्हा नेण्याची धमकी वधूच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. तर नवऱ्याच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप स्वतः नवऱ्याने केला होता.याप्रकरणी आता दोघांनीही लग्न करण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी पोलिस चौकशी सुरु

Uttar Pradesh News
Union Budget 2024: रोजगार निर्मितीवर लक्ष', बजेटआधी PM मोदींची अर्थतज्ज्ञांसोबत बैठक; काय झाली चर्चा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com