Union Budget 2024: रोजगार निर्मितीवर लक्ष', बजेटआधी PM मोदींची अर्थतज्ज्ञांसोबत बैठक; काय झाली चर्चा?

PM Modi Meeting with NITI Aayog: एनडीए सरकारच्या कार्यकाळातील पहिले बजेट 23 जुलै रोजी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करतील.
Union Budget 2024: 'मुख्य लक्ष रोजगार निर्मिती',  बजेटआधी PM मोदींची अर्थतज्ज्ञांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
PM Modi Meeting with NITI Aayog:Saamtv
Published On

दिल्ली, ता. १२ जुलै २०२४

एनडीए सरकारच्या कार्यकाळातील पहिले बजेट 23 जुलै रोजी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करतील. या बजेटमधून तरुण, शेतकरी वर्गासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अर्थतज्ज्ञांसोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये २३ जुलैला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत चर्चा झाली.

Union Budget 2024: 'मुख्य लक्ष रोजगार निर्मिती',  बजेटआधी PM मोदींची अर्थतज्ज्ञांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
Maharashtra Politics: लातूरमध्ये भाजपला धक्का! माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा शरद पवार गटात प्रवेश; दादांच्या आमदाराला आव्हान देणार?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या अर्थसंकल्पापूर्वी गुरुवारी प्रमुख अर्थतज्ज्ञांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. नीती आयोगात ही महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये पुढील आठवड्यात सादर होणाऱ्या बजेटबाबत महत्वाची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या बैठकीत विकसनशील भारत, भांडवली खर्च (कॅपेक्स) आणि रोजगार निर्मिती या विषयांवर चर्चा झाली. यावेळी सरकारचे बजेटमध्ये अधिक लक्ष रोजगार निर्मितीवर असेल. रोजगार निर्मितीसोबतच विकसित भारत निर्माण करण्याची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली.

Union Budget 2024: 'मुख्य लक्ष रोजगार निर्मिती',  बजेटआधी PM मोदींची अर्थतज्ज्ञांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
Mumbai Crime News: झोपमोड झाल्याने मुलगा संतापला; रागाच्या भरात आईला २२ वेळा चाकूनं भोसकलं; मुंबईतील धक्कादायक घटना

तसेच या बजेटमध्ये सरकार स्वदेशीचा नारा बुलंद करण्यासाठी प्रयत्न करेल. त्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात येऊ शकते. स्वदेशी मालावरील कर कपात आणि सबसिडीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे या स्वस्त उत्पादनांकडे ग्राहकांचा ओढा वाढेल. दरम्यान, काल झालेल्या या बैठकीला सुरजित भल्ला, ए के भट्टाचार्य, प्राध्यापक अशोक गुलाटी, गौरव बल्लभ, अमिता बत्रा, महेंद्र देव आणि केव्ही कामथ इत्यादी तज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ उपस्थित होते.

Union Budget 2024: 'मुख्य लक्ष रोजगार निर्मिती',  बजेटआधी PM मोदींची अर्थतज्ज्ञांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
Ahmednagar Accident: हृदयद्रावक! भरधाव डंपरच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर जखमी; ७ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com