Arvind Kejriwal Bail: ब्रेकिंग! CM अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन; पण मुक्काम जेलमध्येच

Arivind Kejriwal Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कथित मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे.
Arvind Kejriwal: ब्रेकिंग! CM अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन; पण मुक्काम जेलमध्येच
Arvind Kejriwal On CongressANI
Published On

दिल्ली. ता. १२ जुलै २०२४

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कथित मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. पण सध्या केजरीवाल हे सीबीआयच्या कोठडीत असल्याने केजरीवाल यांचा जेलच्या बाहेर येण्याचा मार्ग खडतर आहे.

Arvind Kejriwal: ब्रेकिंग! CM अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन; पण मुक्काम जेलमध्येच
Mlc Election : विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्वीस्ट; भाजप आमदाराच्या मतदानाला काँग्रेसचा विरोध, महायुतीचं टेन्शन वाढलं

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. पण त्यांना तुरुंगातून बाहेर येण्याची वाट बिकट आहे. कारण हा जामीन त्यांना ईडीच्या प्रकरणात मिळाला आहे आणि ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांचा मुक्काम जेलमध्येच असण्याची शक्यता आहे.

केजरीवाल यांना सीबीआयने २६ जून रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे याप्रकरणाचा खटला अद्याप प्रलंबित आहे. या प्रकरणी १८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतरच अरविंद केजरीवाल बाहेर येणार की जेलमध्येच राहणार? याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

Arvind Kejriwal: ब्रेकिंग! CM अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन; पण मुक्काम जेलमध्येच
Ahmednagar Accident: हृदयद्रावक! भरधाव डंपरच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर जखमी; ७ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे आम आदमी पक्षाने स्वागत केले आहे. अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आपकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. सत्यमेव जयते असे म्हणत आपने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Arvind Kejriwal: ब्रेकिंग! CM अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन; पण मुक्काम जेलमध्येच
Ambarnath Crime: अंबरनाथमध्ये झालेल्या हत्येचा उलघडा! मुळशीमधून आरोपी अटकेत; धक्कादायक कारण समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com