Buldhana: पळशी झाशी गावात अघोरी विद्येचा प्रकार, पाणी पिण्यास ग्रामस्थांमध्ये भीती, नेमकं काय घडलं?

राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई उद्भवलेले असताना अशाप्रकारे अघोरी कृत्य करून काही समाजकंटक दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उघड झालं आहे.
rumour spread in palshi jhansi near buldhana about poisonous in water storage tank
rumour spread in palshi jhansi near buldhana about poisonous in water storage tankSaam Digital
Published On

संपूर्ण राज्यात पाणी टंचाईचे संकट गडद असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील पळशी झाशी गावात घडलेला अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला. रविवारी रात्री अज्ञात व्यक्तीने गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीखाली अघोरी प्रकाराने पूजा केली व दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. सध्या गावातील नागरिक भयभीत झाले असून ते पाणी पिण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. (Maharashtra News)

पळशी झाशी गावात आज सकाळी गावकऱ्यांना पाण्याच्या टाकीजवळ परडी, त्यात अन्न पदार्थ आणि काही गाेष्टी दिसल्या. कुणीतरी गावाच्या टाकीचे पूजन करून या टाकीत विष कालवल्याचा अफवा पूर्ण गावात पसरली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे गावातील नागरिक या टाकीतील पाणी पिण्यास घाबरु लागले आहेत. या परिसरातील अंधश्रद्धा निर्मूलनचे सक्रिय कार्यकर्ते असलेले अभय मारोडे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत गावकऱ्यांची समजूत घातली.

rumour spread in palshi jhansi near buldhana about poisonous in water storage tank
Success Story: पारंपारिक शेतीला बगल देत युवा शेतक-याने शेवगा शेतीतून कमविला लाखाेंचा नफा

अंनिसचे अभय मारोडे म्हणाले कोणीतरी हा खोडसाळपणा केला आहे. अघोरी पूजा नसून हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे. माराेडे यांच्या सांगण्यावरुन देखील गावकऱ्यांची समजूत निघाली नाही. ते हे पाणी पिण्यास धजावत नाही असे चित्र आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई उद्भवलेले असताना अशाप्रकारे अघोरी कृत्य करून काही समाजकंटक दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उघड झालं आहे.

Edited By : Siddharth Latkar

rumour spread in palshi jhansi near buldhana about poisonous in water storage tank
व्हिजन, मुद्दे नसल्यानेच विरोधकांकडून अपप्रचार सुरू : खासदार इम्तियाज जलील

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com