भीषण अपघाताचा थरार; ४ पोलीस कर्मचाऱ्यांसह ५ जणांचा जागीच मृत्यू

Uttar pradesh accident news : नूंहमध्ये भीषण अपघाताचा थरार पाहायला मिळाला. या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांसह तक्रारदाराचा मृत्यू झाला.
uttar pradesh accident
uttar pradesh news Saam tv
Published On
Summary

उत्तर प्रदेशातील पोलीस कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला

अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला

अपघातानंतर पोलिसांच्या वर्तुळात शोककळा

उत्तर प्रदेशच्या जालौनहून हरियाणाच्या नूंहमध्ये अपहरण प्रकरणात धाड टाकायला गेलेल्या पोलिसांच्या पथकाच्या वाहनाचा अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत दोन पोलीस उपनिरीक्षक, दोन शिपाई आणि एक तक्रारदार असे मिळून ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पोलिसांच्या वर्तुळात शोककळा पसरली आहे.

uttar pradesh accident
मध्यरात्री कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाही; पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, जालौन पोलिसांचं पथक अपहरण प्रकरणात नूंहमध्ये पोहोचलं. त्यानंतर परतताना पोलिसांच्या पथकाच्या वाहनाचा अपघात झाला. पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोहित यादव, पोलीस अधिकारी सत्यभान यांच्यासहित दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच एका तक्रारदाराचाही मृत्यू झाला. कारवाई केल्यानंतर घरी परतताना अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

uttar pradesh accident
भयकंर! दोन भरधाव कारची समोरसमोर धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर भीषण अपघात झाला. कार भरपूर वेगात होती. त्याचवेळी चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावलं. त्यानंतर कार अनियंत्रित होऊन अपघात झाला. अपघातात कारच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला. कारमधील सर्वांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

uttar pradesh accident
पालघर हादरले! एकाच ठिकाणी २ तरूणांचे आढळले मृतदेह; आत्महत्या की घातपात, नेमकं झालं काय?

अपघातानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहेत. परंतु तोर्यंत कारमधील सर्वांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी कारमधील मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना तातडीने माहिती दिली. ४ ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर पुन्हा एकदा रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांच्या दुसऱ्या राज्यात जाऊनही शोध घ्यावा लागतो. य पथकाला रस्ते मार्गाने जाताना अपघाताची भीती असते.

uttar pradesh accident
Accident News : महामार्गावर भयंकर अपघात! उभ्या ट्रकला भरधाव कारची धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

उत्तर प्रदेशातील जालौन - झांसी - कानपूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले. कालपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोल्हुपूरजवळ चौरासा गुबंदजवळ ही अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात असलेली कार पाठीमागून ट्रकच्या खाली घुसली. त्यानंतर कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com