

छत्तीसगडमध्ये दोन कारची समोरासमोर धडक
भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू
तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू
छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन भरधाव कारची समोरसमोर धडक झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू करण्यात आले आहे. भीषण अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली.
कांकेर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल अशोक कुमार राखेचा यांनी रात्री ११ वाजता दोन कारची धडक झाली. यात सहा जणांनी जीव गमावले. तर तिघे गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांकेर जिल्ह्यातील नाथिया नावगांव येथे ही घटना घडली आहे. दोन्ही कार भरधाव वेगात होत्या. नवांगावात दोन्ही कार एकमेकांना धडकल्या. या अपघातात दोन्ही कार चक्काचूर झाल्या आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
अपघात झाल्यानंतर तातडीने घटनास्थळी रुग्णावाहिका बोलावण्यात आली. जखमींना रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, गंभीर जखमी व्यक्तींची प्रकृती नाजूक असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्याला मदत केली. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले. कारचा अपघात नेमका कसा झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
रस्त्यावरील वाढत्या अपघातामुळे नागरिकांची वाढली आहे. गेल्या काही दिवसांत देशातील विविध ठिकाणी भीषण अपघात झाले आहेत. त्यात आता छत्तीसगडच्या अपघाताची भर पडली आहे. वाढत्या अपघात रोखण्यासाठी योग्य पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.