Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, टँकरच्या चाकाखाली चिरडून प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू

Pune Bike And Tranker Accident: पुण्यातील महंमदवाडी परिसरात भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये राष्ट्रीय फुटबॉलपटूचा मृत्यू झाला.
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, टँकरच्या चाकाखाली चिरडून प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू
Pune AccidentSaam Tv
Published On

Summary -

  • पुण्यात भीषण रस्ते अपघात

  • १९ वर्षीय फुटबॉलपटूचा दुर्दैवी मृत्यू

  • कोंढवा परिसरात घटना

  • टँकर चालकाला पोलिसांनी केली अटक

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये भीषण अपघातामध्ये १९ वर्षीय राष्ट्रीय फूटबॉलपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली. दुचाकीवरून जाणाऱ्या फुटबॉलपटूच्या दुचाकीला टँकरने धडक दिली. टँकरच्या चाकाखाली चिरडून गंभीर जखमी झालेल्या फुटबॉलपटूचा जागीच मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी टँकर चालकाला पोलिसांनी अटक केली. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. फुटबॉलपटूच्या मृत्यूमुळे पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महंमदवाडी हद्दीतील क्लाऊड नाइन परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीला टँकरने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील फुटबॉलपटू खाली पडला. त्यानंतर टँकरच्या चाकाखाली आल्यामुळे या फुटबॉलपटूचा मृत्यू झाला. आरिफ शेख असे मृत तरुणाचे नाव होते. आरिफ शेख फुटबॉल चॅम्पियन होता. तो कोंढव्यातील पारगेनगरमध्ये राहत होता.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, टँकरच्या चाकाखाली चिरडून प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू
Pune Accident: नवले पुलावर सलग दुसऱ्या दिवशी अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक; चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लाऊड नाइन परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आरिफला तातडीने वानवडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरीझने नुकताच बारावीची परिक्षा दिली होती. परीक्षा संपल्यामुळे तो कुटुंबीयांसोबत फिरायला केरळला गेला होता.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, टँकरच्या चाकाखाली चिरडून प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू
Mumbai Pune Expressway accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा अपघात, खालापूरजवळ कारचा चेंदामेंदा अन् रक्ताचा सडा, ३ जणांचा मृत्यू

रविवारी सकाळी आरीझ केरळवरून पुण्यात आला होता. पुण्यात आल्यानंतर तो रविवारी सायंकाळी मित्रांना भेटण्यासाठी दुचाकीवरून जाताना ही अपघाताची घटना घडली. आरीझच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या अपघातानंतर काळेपडळ पोलिसांनी टँकर चालक रवींद्र भीमराव दनाने (३४ वर्षे ) याच्याविरोधात गु्न्हा दाखल करत त्याला अटक केली. आरीझच्या मृत्यूमुळे तो राहत असलल्या कोंढवा परिसरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, टँकरच्या चाकाखाली चिरडून प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची बसला धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com