पगारवाढीवरून तुफान राडा; पोलीस आणि कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की, कामगारांकडून पोलीस वाहनांची तोडफोड

Noida Workers Protest Violence: पगारवाढीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या कामगारांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पोलीस आणि कामगारांमध्ये धक्काबुक्की झाली. यानंतर कामगारांनी तोडफोड आणि जाळपोळ केली.
Noida Workers Protest Violence
saam tv
Published On
Summary
  • पगारवाढीच्या मागणीवरून आंदोलन हिंसक

  • कामगार-पोलीस यांच्यात धक्काबुक्की

  • पोलीस वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ

वेतनवाढीच्या मागणीसाठी नोएडामध्ये सुरू असलेले कामगारांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. सोमवारी सकाळी ग्रेटर नोएडाच्या फेज २ मधील होजरी कॉम्प्लेक्स डी ब्लॉकमध्ये कामगार आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की झाली. यानंतर कामगारांनी पोलिसांचे वाहनांची तोडफोड करत त्यांना पेटवून दिले. यामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

Noida Workers Protest Violence
भीषण अपघात! भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन स्कूल बसची समोरासमोर धडक, १२ विद्यार्थी जखमी

दरम्यान नियंत्रणाच्या बाहेर गेलेल्या स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्यां फोडल्या. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तसेच पीएसी तैनात करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे कर्मचारी पगारवाढीच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत होते. सोमवारी या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले.

Noida Workers Protest Violence
State Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार,बंडखोर आमदारांची वर्णी लागणार

आंदोलक आणि पोलीस यांच्यात वाद झाला त्यानंतर धक्काबुक्की झाली. संतप्त कामगारांनी पोलिसांवर दगडफेक केली. घटनास्थळी उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली, असा पोलीस कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर, पोलिसांचे एक वाहनाला पलटी केले, काही ठिकाणी जाळपोळ झाली. यामुळे आंदोलनाची स्थिती अजून जास्त बिघडली.

परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. त्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले. यानंतर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आणण्यात आली.

या संपूर्ण घटनेनंतर नोएडा पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून कारवाई सुरू केली आहे. प्राथमिक तपासाच्या आधारे अनेक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com