

बंडखोर आमदारांना सामावून घेण्याची शक्यता आहे.
भाजपची रणनीती ठरवण्यासाठी बैठका
बंडखोर आमदारांना मंत्रीपदाची शक्यता
उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा पुन्हा नव्याने होऊ लागली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि यूपी निरीक्षक विनोद तावडे रविवारी लखनौमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि संघटन सरचिटणीस धर्मपाल सिंह यांच्यासोबत बैठका घेतल्या.
मागील काही दिवसांपासून योगी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू आहेत. पण काही दिवसापूर्वी या चर्चांना थांबल्या होत्या, त्यानंतर आता पुन्हा या चर्चांना पेव फुटले आहे,त्याचे कारण म्हणजे राष्ट्रीय सरचिटणीस आणि यूपी निरीक्षक विनोद तावडे लखनौमध्ये दाखल झाले आहेत.
दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी २०२२ मध्ये मुख्यमंत्री झाले होते. मार्च २०२४ मध्ये पहिल्यांदा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. आता मंत्रिमंडळाचा दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये आमदारांच्या संख्येनुसार ६० मंत्री असू शकतात. लोकसभा निवडणुकांनंतर कॅबिनेट मंत्री जितीन प्रसाद आणि राज्यमंत्री अनुप प्रधान वाल्मिकी खासदार झाले.
जास्तीत जास्त ६० मंत्र्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह ५४ सदस्य आहेत. यामध्ये २१ कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र कार्यभार असलेले १४ मंत्री आणि १९ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे, योगी मंत्रिमंडळात आणखी सहा मंत्र्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. २०२४ च्या राज्यसभा निवडणुकीत सपाच्या सात आमदारांनी क्रॉस-व्होटिंग केले होती. यापैकी दोघांना मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. मंत्र्यांसोबतच राज्यभरातील जवळपास तीन डझन आयोग, महामंडळे आणि मंडळांमध्ये पदे रिक्त आहेत.
एकूण विद्यमान सदस्य: ५४ (मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह)
कॅबिनेट मंत्री: २१
राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार): १४
राज्यमंत्री: १९
रिक्त पदे: ०६
उत्तर प्रदेशात २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकांपूर्वी भाजप संघटना आणि सरकारमध्ये सुव्यवस्था आणण्याचा प्रयत्न करत आहे. शनिवारी, प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी आणि राज्य संघटन महासचिव धर्मपाल सिंह यांनी लखनौमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यामुळे मंत्रिमंडळ आणि संघटनात्मक विस्तारावर चर्चा सुरू झाली. आजच्या बैठकीमुळे या अटकळांना आणखी बळ मिळाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.