भुजबळांचं हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरलं; तांत्रिक बिघाड, कधी इमर्जन्सी लँडिंग! नेत्यांची सुरक्षा भरकटली

Helicopter Land In Parking: 'मंत्री छगन भुजबळाचं हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी थेट पार्किंगच्या जागेत उतरवण्याचा प्रताप एका पायलटनं केलाय. त्यामुळे हेलिकॉप्टरमधून प्रवास करताना नेत्यांची सुरक्षा कशी भरकटलीय..पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Helicopter Land In Parking: '
Helicopter carrying Chhagan Bhujbal lands in parking area, triggering safety concerns.saam tv
Published On

नेत्यांच्या विमानांचे अपघात, इमर्जन्सी लँडिंग आणि आता चक्क पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरक्षेचा आज पुरता विचका झाला. ज्या ठिकाणी गाड्या उभ्या केल्या जातात, त्याच कार पार्किंगमध्ये भुजबळांच्या पायलटनं थेट हेलिकॉप्टर उतरवलं.

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला छगन भुजबळ पुरंदर तालुक्यातील खानावडी येथे हेलिकॉप्टरनं जाण्यासाठी निघाले. भुजबळ खानावडीत पोहचले. मात्र पायटलनं हेलिपॅडऐवजी थेट पार्किंगच्या जागेतच हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न केला. विजेच्या तारांमधून कसं बसं हेलिकॉप्टर पार्किगच्या जागेत उतरवलं. यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोकाचं चुकला.

Helicopter Land In Parking: '
मंत्री छगन भुजबळांचे हेलिकॉप्टर पायलटनं कार पार्किंगमध्ये का उतरवलं? धक्कादायक कारण आलं समोर

हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या भुजबळांनी काळजी करण्याचं कुठलचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया दिलेली असली तरी मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करू असं म्हटलय. दुसरीकडे सकाळी भरकटलेल्या याच हेलिकॉप्टरमधून मंत्री छगन भुजबळ पुन्हा रवाना झालं.

Helicopter Land In Parking: '
मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर अचानक कार पार्किंगमध्ये लँडिंग, पायलटकडून मोठी चूक

एकूणच या घटनेमुळे मंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मात्र ही घटना काही पहिलीच नाही. याआधीही अनेक नेत्यांच्या सुरक्षा यंत्रणेत हलर्गजीपणा दिसून आलाय.

25 मे 2017

लातूरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर हवेत घिरट्या घेऊन जमिनीवर आदळलं.

3 मे 2024

महाडमध्ये सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर जमिनीवर लॅण्डीग होताना कोसळलं

28 जानेवारी 2026 ला

अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू.

नेत्यांचे दौरे म्हणजे केवळ ताफा आणि प्रोटोकॉल नाही, तर त्यांच्या सुरक्षेची शंभर टक्के खात्री असते. पण खानावडीतील या प्रकाराने सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघालेत. पायलटच्या चुकीमुळे होणारे अपघात आणि एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर्सचा तांत्रिक बिघाडाकडे केलेला कानाडोळा यामुळे अपघाताची संख्या वाढते. आता तरी प्रशासन या गंभीर विषयाकडे लक्ष देणार का? हा खरा प्रश्न आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com