मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर अचानक कार पार्किंगमध्ये लँडिंग, पायलटकडून मोठी चूक

chhagan bhujbal helicopter : मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर अचानक कार पार्किंगमध्ये लँडिंग केल्याने एकच गोंधळ उडाला. पायलटच्या चुकीने पार्किंगमध्ये लँडिग करण्यात आले.

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्याच्या पूरंदरमधून मोठी बातमी हाती आली आहे. पुण्यातील खानवडीतील पूरंदरमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी पायलटने कार पार्किंगमध्येच लँडिंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर लँडिंग केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. खानवडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ खानवडी गावात गेले होते.

नेमकं काय घडलं?

छगन भुजबळ हेलिकॉप्टरने आज सकाळी खानवडीत आले होते. ते सकाळी पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे महात्मा फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त आले होते. चुकीच्या पद्धतीने कार पार्किंग भागात हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. चूक लक्षात आल्यानंतर हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी हेलिपॅड बनवण्यात आले, त्या ठिकाणी हलवण्यात आले. मात्र, हलगर्जीपणामुळे एवढी मोठी चूक कोणाची हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com