Stray Dog Attacks: मंदिरात दिवे लावण्यासाठी जाताना ११ वर्षीय मुलावर कुत्र्यांचा हल्ला

Uttar Pradesh: परिसरात असलेल्या एका मंदिरात तो दिवे लावण्यासाठी जात होता. तो एकटा असल्याचं पाहून तेथील काही कुत्रे त्याच्यावर भुंकू लागले. कुत्र्यांना पाहून त्यान तेथून पळू लागला.
Stray Dog Attacks
Stray Dog AttacksSaam TV
Published On

Kanpur Dog Attacks On Boy:

युपीच्या कानापुर येथून हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. एका लहान मुलावर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या एका टोळक्याने हल्ला केला आहे. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Stray Dog Attacks
Kanpur News : पाळीव मांजरीने घेतला पिता-पूत्रांचा जीव; मांजरीचाही मृत्यू, नेमकं काय घडलं?

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शुभम असं ११ वर्षीय मुलाचं नाव आहे. परिसरात असलेल्या एका मंदिरात तो दिवे लावण्यासाठी जात होता. तो एकटा असल्याचं पाहून तेथील काही कुत्रे त्याच्यावर भुंकू लागले. कुत्र्यांना पाहून तो तेथून पळू लागला. पळताना पाहून ३ ते ४ कुत्रे त्याच्या मागे लागले आणि भुंकू लागले.

पळता पळता शुभम खाली पडला. तितक्यात त्याच्या मागे पळत असलेल्या सर्व कुत्र्यांनी त्याच्यावर झडप घातली. कुत्र्यांनी त्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात त्याच्या हातांना बऱ्याच जखमा झाल्यात. ही घटना घडली तेव्हा या मुलाजवळ तेथे कोणीच नव्हतं.

खाली पडून तो स्वत:च्या बचावासाठी ओरडत होता. काही व्यक्तींनी त्याचा आवाज ऐकला आणि ते त्याच्याजवळ पळत आले. नागरिकांनी कुत्र्यांना दगडं मारून तेथून पळून लावलं. जखमी अवस्थेत या मुलाला नागरिकांनी रुग्णालयात देखील दाखल. शुभमच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी देखील रुग्णालयात धाव घेतली.

काही नागरिकांनी शुभच्या आई वडिलांना सांगितले की, मंदिराजवळ एक दाम्पत्य राहतं. ते दोघेही या सर्व कुत्र्यांना खाऊ घालतात. त्यामुळे भटके कुत्रे देखील येथून जात नाहीत. ही माहिती मिळताच शुभमचे आई-बाबा त्या दाम्पत्याच्या घरी पोहचले आणि वाद करू लागले. शेवटी अन्य नागरिकांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला.

Stray Dog Attacks
Shocking Viral Video: फुटबॉल खेळताना खेळाडूच्या अंगावर पडली वीज; पुढे काय घडलं? पाहा थरकाप उडवणारा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com