Kanpur News : पाळीव मांजरीने घेतला पिता-पूत्रांचा जीव; मांजरीचाही मृत्यू, नेमकं काय घडलं?

Father-Son Dies Due to Rabies : मांजरीने पिता-पुत्राला चावा घेतला तेव्हा त्यांनी ते हलक्यात घेतलं आणि रेबीजचं इंजेक्शन घेतलंच नाही. यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
Kanpur News
Kanpur NewsSaam TV
Published On

Father-Son Dies Due to Rabies :

कुत्रा-मांजरांसह अनेक प्राणी घरात पाळण्याची काहींना आवड असते. मात्र मांजर पाळणे कानपूरमधील बाप-लेकाच्या जीवावर बेतलं आहे. पाळीव मांजर चावल्यानंतर एका आठवड्यात वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांजरीला काही दिवसांपूर्वी एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे तिच्या शरीरात संसर्ग पसरला होता. जेव्हा मांजरीने पिता-पुत्राला चावा घेतला तेव्हा त्यांनी ते हलक्यात घेतलं आणि रेबीजचं इंजेक्शन घेतलंच नाही. यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kanpur News
PM Modi-Giorgia Meloni Selfie : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी PM मोदींच्या फॅन, 'गुड फ्रेंड्स' म्हणत शेअर केला सेल्फी

इम्तियाजुद्दीन आणि अजीम अशी मृत पिता-पुत्रांची नावं आहे. इम्तियाजुद्दीन यांनी घरात एक मांजर पाळली होती. या मांजरीला सप्टेंबरमध्ये भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये मांजरीने इम्तियाजुद्दीन यांच्या पत्नीला आपल्या पंजा मारला होता. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. त्यानंतर काही दिवसांनी मांजरीने मुलगा अजीमला चावा घेतला. त्यानंतर दोन तासांनी इम्तियाजुद्दीन यांनाही मांजरीने चावा घेतला. (Latest Marathi News)

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मांजराचा मृत्यू झाला. 20 नोव्हेंबरला अजीमची प्रकृती बिघडू लागली. कुटुंबियांनी त्याला खासगी डॉक्टरांकडे नेले. मात्र त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच गंभीर होत गेली आणि त्याचा मृत्यू झाला. अशीच परिस्थिती इम्तियाजुद्दीन यांच्या बाबतीतही घडली. 29 नोव्हेंबर रोजी इम्तियाजुद्दीन यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचाही गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Kanpur News
Anju India Return Reason: अंजू पाकिस्तानातून का पळून आली? कारण चक्रावणारं, आता भारतातूनही गायब?

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, पिता-पुत्रात आढळलेली लक्षणे ही रेबीजची होती. रेबीज संसर्ग धोकादायक आहे. जर कोणी आपल्या घरात पाळीव कुत्रा किंवा मांजर पाळत असेल तर त्याला रेबीजचे इंजेक्शन दिले पाहिजे. जेणेकरून कुटुंबातील सदस्यांना व मुलांना कोणतीही अडचण येऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com