Shocking Viral Video: फुटबॉल खेळताना खेळाडूच्या अंगावर पडली वीज; पुढे काय घडलं? पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Indonesia Football Match Viral Video: इंडोनेशियात अंगाला काटा आणणारी घटना घडली आहे. फुटबॉलच्या मैदानावर असं काही घडलं आहे, जे यापूर्वी क्वचितच घडलं असावं.
viral video
viral videotwitter

Indonesia Football Match Lightning:

इंडोनेशियात अंगाला काटा आणणारी घटना घडली आहे. फुटबॉलच्या मैदानावर असं काही घडलं आहे, जे यापूर्वी क्वचितच घडलं असावं. लाईव्ह फुटबॉल सामन्यादरम्यान अचानक खेळाडूवर वीज पडली. वीज पडताच खेळाडूचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

लाईव्ह सामन्यात खेळाडूवर पडली वीज..

तर झाले असे की, शनिवारी (१० फेब्रुवारी) एफबीआय शुबेंग आणि एफसी बेडुंग या दोन्ही संघांमध्ये फुटबॉलचा रोमांचक असा सामना सुरू होता. खेळाडूंमध्ये चुरशीची लढत सुरू होती. प्रेक्षकही सामन्याचा आनंद घेत होते. मात्र त्याचवेळी असं काही घडलं की, क्षणात होत्याचं नव्हतं झालं. लाईव्ह सामन्यात खेळाडूच्या अंगावर वीज पडली .(Sports news in marathi)

viral video
IND vs ENG 3rd Test: सरफराजचं पदार्पण होणार! या युवा खेळाडूलाही मिळणार प्लेइंग ११ मध्ये स्थान

व्हिडिओ होतोय व्हायरल..

एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात तुम्ही पाहू शकता की अचानक खेळाडूवर वीज पडते. वीज पडल्यानंतर मोठा धमाका होतो आणि आग पेटते. अंगावर वीज पडताच तो खेळाडू जागीच कोसळला. त्यानंतर मैदानावर असलेले इतर खेळाडू आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागतात. तर काही खेळाडू मैदानावरच झोपले.

ज्या खेळाडूवर वीज पडली, त्या खेळाडूला स्ट्रेचरच्या साहाय्याने मैदानाच्या बाहेर नेण्यात आलं. काही वेळ त्याचा श्वास सुरु होता. त्याला रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्याने जीव सोडला. रुग्णालया पोहचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

viral video
IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी ?दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com