सतना जिल्हा रुग्णालयातील (Satna Hospital) इमर्जन्सी वॉर्डमध्ये बाईकवरून आलेल्या तरुणाने फिल्मी स्टाईलमध्ये पेशंटसह प्रवेश केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उपस्थितांना रूग्णालयात 3 इडियट्स' या चित्रपटातील एक स्टंट पाहायला मिळाला आहे. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. (Latest News)
मध्य प्रदेशमध्ये एका व्यक्ती त्याच्या आजोबांना बेशुद्ध अवस्थेत बाइकवरून हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये घेऊन गेला. भोपाळपासून 450 किलोमीटर अंतरावर असलेल्या सतना येथील सरदार वल्लभभाई पटेल जिल्हा रुग्णालयात ही घटना (3 Idiots Stunt ) घडली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नातू बाईकवरून थेट इमर्जन्सी वॉर्डमध्ये
शनिवारी रात्री उशिरा नीरज गुप्ता नावाच्या व्यक्तीच्या आजोबांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्याने आपल्या आजोबांना दुचाकीवरून रुग्णालयात नेलं. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला (Man Entered Emergency Ward On Bike) आहे. व्हिडिओमध्ये गुप्ता इमर्जन्सी वॉर्डच्या मध्यभागी त्याची दुचाकी थांबवताना दिसत आहेत. त्याच्या पाठीमागे असलेला सुरक्षा रक्षकही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय.
यानंतर हॉस्पिटलचे कर्मचारी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या आजोबांना दुचाकीवरून उतरण्यास मदत करतात. त्यानंतर नीरज गुप्ता आपली दुचाकी सोडून वॉर्डातून बाहेर पडताना दिसत आहे. या घटनेमुळे इतर रुग्णांमध्ये घबराट पसरली आहे. नंतर आजोबांची माहिती घेण्यासाठी नीरज पुन्हा रुग्णालयात येताना (3 Idiots Stunt In Satna Hospital) दिसतो. घटनेची माहिती मिळताच इमर्जन्सी वॉर्डच्या डॉक्टरांनी गुप्ताला चांगलंच सुनावलं आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली ( 3 Idiots Stunt Video) आहे. काहीजण त्याला परिस्थितीचं गांभीर्य समजून घेता आलं नाही, म्हणून त्याच्यावर टीका करत आहेत. तर काहींनी त्याला असं पाऊल उचलण्यास भाग पाडलेल्या परिस्थितीबद्दल प्रश्न विचारत आहेत.
चित्रपटांमध्ये अशी दृश्ये आपल्याला थरारक वाटत असतात. परंतु, वास्तविक जीवनात रुग्णालयाच्या आवारात अशा कृती धोकादायक ठरू शकतात. इतर रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी असे प्रसंग त्रासदायक ठरू (Video Viral) शकतात. पण आजारी आजोबांसोबत नातवाची बाईकवरून थेट इमर्जन्सी वॉर्डमध्ये एन्ट्री चांगलीच व्हायरल होतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.