सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. सोशल मीडियावर लग्न सोहळ्यातील अनेक गमती- जमतींचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. लग्नात कधी भन्नाट डान्सची, हटके एन्ट्रीची, नवरा- नवरीच्या जुगलबंदीची नेहमीच चर्चा होताना दिसते. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडिओ चर्चेत येण्याचे कारण म्हणजे नवरा- नवरीची खास एन्ट्री.
लग्न म्हणजे (Wedding) दोन जिवांचा संगम. लग्नात नवरा अन् नवरीकडे सर्वांचे लक्ष असते. लग्न सोहळ्यावेळी होणारे प्रत्येक विधी, गमती- जमती पाहण्याची सर्वांना उत्सुकता असते. लग्न सोहळ्यातील अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात.
कधी नवरा- नवरीच्या जबरदस्त एन्ट्रीची, कधी डान्सची, तर कधी पाहुण्यांमध्ये जुंपलेल्या भांडणांची माध्यमांवर चर्चा पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका हटके एन्ट्रीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या भावी दांपत्याने बुलेट, घोड्याचा वापर न करता थेट बैलगाडीतून लग्न मंडपात एन्ट्री केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाच्या मंडपात नवरा- नवरी बैलगाडी घेऊन जाताना दिसत आहेत. यावेळी दोघेही महाराष्ट्रीयन पोषाखात खूपच सुंदर दिसत आहेत. नवरीने नऊवारी साडी अन् दागिने असा खास लूक केला होता. नवरीच्या हातात बैलांची दोरी होती. सजवलेल्या बैलगाडीतून नवरा- नवरीची झालेली खास एन्ट्री पाहून पाहुणे मंडळीही अवाक् झाली.
इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आलेल्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. या खास एन्ट्रीवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तर काही युजर्सनी नवरा- नवरीच्या खास लूकचेही कौतुक केले आहे. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.