राज्यात बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

List Of IPS Officers Transferred In Uttar Pradesh 2026: उत्तर प्रदेशात 6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लखनऊ, कानपूर, मिर्झापूर, आग्रा यांसह महत्त्वाच्या ठिकाणी नवीन नियुक्त्या केल्या आहे.
Representative image of Indian Police officers amid a major IPS reshuffle in Uttar Pradesh.
Representative image of Indian Police officers amid a major IPS reshuffle in Uttar Pradesh.saam tv
Published On

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यावेळी 6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये लखनऊ, कानपूर, मेरठ आणि मुरादाबाद येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कोणत्या अधिकाऱ्याला कुठे नियुक्ती मिळाली आहे, यादी खालीलप्रमाणे

Representative image of Indian Police officers amid a major IPS reshuffle in Uttar Pradesh.
TMC Crisis : २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात; ममता बॅनर्जींची TMC फुटणार

6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

उत्तर प्रदेश सरकारने आयपीएस अधिकारी रवि शंकर छवी, हरीश चंदर, पूनम, अशोक कुमार, सचिंद्र पटेल आणि यमुना प्रसाद यांची बदली केली आहेत. या अधिकाऱ्यांना लखनऊ, मिर्झापूर, गोंडा, आग्रा आणि कानपूर येथे विविध पदांवर नियुक्त करण्यात आले आहे. आयपीएस रवि शंकर छवी यांची बदली मुख्यालय पोलिस महासंचालक, लखनऊ येथून लोकशिकायत मुख्यालय पोलिस महासंचालक येथे करण्यात आली आहे. तर हरीश चंदर यांची बदली पोलिस उपमहानिरीक्षक, कानपूर येथून भ्रष्टाचार निवारण संघटना, लखनऊ येथे करण्यात आली आहे.

Representative image of Indian Police officers amid a major IPS reshuffle in Uttar Pradesh.
मोठी बातमी! तामिळनाडूच्या सत्तास्थापनेचा पेच कोर्टात पोहचला, नेमकी काय केली याचिका?

आयपीएस (IPS) पूनम यांची मिर्झापूरमध्ये नियुक्ती

आयपीएस पूनम यांची पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून मिर्झापूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्या पोलिस उपमहानिरीक्षक/प्राचार्य, पीटीएस, मेरठ येथे कार्यरत होत्या. तसेच आयपीएस अशोक कुमार यांना पोलिस उपमहानिरीक्षक पदावर गोंडा येथे पाठविण्यात आले असून ते यापूर्वी सीआयडी, लखनऊ येथे कार्यरत होते.

Representative image of Indian Police officers amid a major IPS reshuffle in Uttar Pradesh.
Shocking : नामांकित कॉलेजच्या प्रोफेरसरच्या फ्लॅटवर भयंकर घडलं, पोलिसांनी दरवाजा उघडला अन् ...

सचिंद्र पटेल यांची आग्र्यात नियुक्ती

आयपीएस सचिंद्र पटेल यांची बदली भ्रष्टाचार निवारण संघटना, लखनऊ येथून अपर पोलिस आयुक्त म्हणून पोलिस कमिश्नरेट, आग्रा येथे करण्यात आली आहे. तसेच, आयपीएस यमुना प्रसाद यांची मुरादाबाद येथून पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून कानपूर येथे बदली करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com