Shocking : जिवापाड मांजरीने जीव सोडला; मृत्यूनंतर ३ दिवस घरातच ठेवला मृतदेह, चौथ्या दिवशी मालकिणीने आयुष्य संपवलं

Shocking uttar pradesh news : जिवापाड मांजरीने जीव सोडल्यानंतर मालकिणीने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. मांजरीच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या मालकिणीने आत्महत्या केली आहे.
uttar pradesh shocking
shocking Saam tv
Published On

उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथील हसनपूरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. मोहल्ला रहरा रोडच्या शिव मंदिराजवळ राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने धक्कादायक पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. पाळीव मांजरीच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या मालकिणीने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे.

पूजा असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पूजाचं प्राणीमात्रांवर अपार प्रेम होतं. पूजा मांजरीवर स्वत:च्या मुलांसारखं सांभाळ करायची. पूजाला जीवापाड मांजरीच्या मृत्यूचा धक्का बसला. त्यानंतर नैराश्यात गेलेल्या पूजाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी मांजरीच्या मृत्यूनंतर पूजा दु:खात बुडली होती. पूजा मांजरीचा मृत्यू झाल्यानंतरही जीवंत असल्याचे मानून सांभाळ केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजाने तिसऱ्या मजल्यावरील घरात आत्महत्या केली. पूजाने आत्महत्या केल्याचे कळताच कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

uttar pradesh shocking
Shocking News : प्रेमाचा भयानक शेवट! बॉयफ्रेंडने धोका दिला, प्रसिद्ध डान्सरने मृत्यूला कवटाळलं

मृत पूजाच्या आईने सांगितलं की, 'पूजाला लहानपणांपासून प्राण्यांवर प्रेम होतं. बेघर प्राण्यांनाही मदत करायची . स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, पूजा खूप संवेदनशील होती. तिचं प्राणीमात्रांवर खूप प्रेम होतं. ती दिवसरात्र प्राण्यांच्या गराड्यात असायची. मात्र, घरातील जीवापाड मांजरीचा मृत्यू झाल्याने पूजाला मोठा धक्का बसला होता.

पूजाच्या मृत्यूमुळे प्राण्यांप्रती प्रेम आणि मानसिक आरोग्याप्रती जागरूक होण्याची गरज मानली जात आहे. आपल्याला आजूबाजूच्या लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. पूजाने आयुष्य संपवल्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. तर पूजा राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

uttar pradesh shocking
Shocking : बाजार घसरला अन् १६ लाखांचा फटका बसला; नैराश्यात नाशिकमधील तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com