Shocking News : प्रेमाचा भयानक शेवट! बॉयफ्रेंडने धोका दिला, प्रसिद्ध डान्सरने मृत्यूला कवटाळलं

kavya kalyani death : बॉयफ्रेंडने धोका दिल्याने प्रसिद्ध डान्सरने मृत्यूला आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रसिद्ध डान्सरच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे.
kavya kalyani death News
kavya kalyani deathSaam tv
Published On

Dancer kavya kalyani death : प्रेमात लोक कोणत्यााही थराला जातात. आवडत्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असतात. प्रेमात असलेले व्यक्ती रागाच्या भरात कोणतंही पाऊल उचलताना मागे पुढे पाहत नाही. असाच प्रकार एका प्रसिद्ध डान्सरने केला आहे. प्रसिद्ध डान्सरच्या आत्महत्येने मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे.

रिअॅलिटी शोमध्ये डान्स करून प्रसिद्धी मिळवलेल्या डान्सरने धक्कादायक पाऊल उचललं आहे. डान्सरने प्रेमात धोका मिळाल्यानंतर टोकाचा निर्णय घेतला. काव्या कल्याण असे आत्महत्या केलेल्या डान्सरचे नाव आहे. काव्याच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे.

kavya kalyani Death
kavya kalyanisaam tv
kavya kalyani death News
Thane Crime : हात वाकलेले, शरीर संपूर्ण काळंकुट्ट पडलेलं, राहत्या घरात पेंटरचा मृतदेह आढळला; ठाण्यात खळबळ

तेलुगू रिअॅलिटी शो 'धी'मुळे घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध डान्सर काव्या कल्याणने आत्महत्या केली आहे. काव्या कल्याणच्या आत्महत्येने मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्याआधी काव्याने सेल्फी व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमध्ये काव्याने आत्महत्या का करत आहे, याविषयी खुलासा केला.

kavya kalyani death News
Beed Crime : आधी अपहरण केलं, मग अमानुष मारहाण; बीडमध्ये 'त्या' मायलेकासोबत काय घडलं?

काव्याने आयुष्य का संपवलं?

काव्या कल्याणने मृत्यूआधी व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यात काव्याने म्हटलं की, 'मला न्याय हवा आहे. मला अभिने धोका दिला. तो दुसऱ्या मुलीसोबत लग्न करत आहे. त्याने घरातून जाण्यासाठी सांगितलं. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. सॉरी मॉम, सॉरी डॅड'.

दरम्यान, काव्या कल्याण आणि तिचा बॉयफ्रेंड अभि उर्फ अभिलाश या दोघांनी रिअॅलिटी शो 'धी'मध्ये एन्ट्री मारली होती. ते दोघे मागील ५ वर्षांपासून एकत्र राहत होते. दोघांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा आहे.

kavya kalyani death News
Crime News : एकटी पडली असती म्हणून गर्लफ्रेंडलाही संपवलं; कुटुंबातील ४ लोकांचा जीव घेणाऱ्या युवकाचा धक्कादायक खुलासा

काव्याच्या व्हिडिओच्या आधारावर पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी काव्याने आई-वडिलांची माफी मागितली. तसेच तिने न्यायाची देखील अपेक्षा केली. काव्याच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com