Crime News : एकटी पडली असती म्हणून गर्लफ्रेंडलाही संपवलं; कुटुंबातील ४ लोकांचा जीव घेणाऱ्या युवकाचा धक्कादायक खुलासा

Kerala News : एका तरुणाने आर्थिक विवंचनेतून कुटुंबीयांसह गर्लफ्रेंडची हत्या केली. माझी गर्लफ्रेंड एकटी पडली असती म्हणून मी तिचाही जीव घेतला असे या तरुणांने पोलिसांना सांगितले. आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

Crime : कर्जबाजारी झाल्यानंतर एका तरुणाने कुटुंबातील ४ जणांची हत्या केली. कुटुंबियांचा खून केल्यानंतर तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडची देखील हत्या केली. ती माझ्याशिवाय एकटी राहू शकणार नाही म्हणून मीच माझ्या गर्लफ्रेंडची हत्या केली असे तरुणाने सांगितले. हत्या केल्यानंतर या तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

केरळमधील वेंजारामूडूमध्ये सामूहिक हत्याकांड घडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील आरोपी तरुणाचे नाव अफान आहे. अफानच्या नावावर ६५ लाख रुपयांचे कर्ज होते. कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने अफान हैराण झाला होता. यामुळे त्याने आत्महत्या करण्याचे ठरवले होते. पण त्याआधी त्याने घरातील सदस्यांची हत्या केली.

अफानने त्याची ८८ वर्षीय आजी, १३ वर्षीय भाऊ, काका आणि काकी यांची हत्या केली. अफानने त्याच्या आईवरही जीवघेणा हल्ला केला होता. पण हल्ल्यात त्याची आई थोडक्यात बचावली. अफानच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घरातल्या सदस्यांचा खून केल्यानंतर अफानने त्याच्या गर्लफ्रेंडचा देखील जीव घेतला.

Crime News
Thane Crime : हात वाकलेले, शरीर संपूर्ण काळंकुट्ट पडलेलं, राहत्या घरात पेंटरचा मृतदेह आढळला; ठाण्यात खळबळ

आर्थिक विवंचनेतून हत्या केल्याचे अफानने पोलिसांना सांगितले. पण या विरुद्ध त्याच्या वडिलांनी जबाब नोंदवला. 'आमच्या कुटुंबावर कोणतेही मोठे कर्ज नव्हते. अफानने हत्या का केली यामागील खरे कारण काय आहे याचा तपास पोलिसांनी करायला हवा, असे अफानचे वडील यांनी सांगितले आहे. दरम्यान या सामूहिक हत्याकांड प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

Crime News
Datta Gade : दत्ता गाडेच्या मोबाईलचा तपास सुरु, कुणाकुणाला फोन अन् कुणाला पैसे पाठवल्याची चौकशी करणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com