Shocking: हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय, पोलिसांच्या धाडीत ४ जणी सापडल्या; २ रशियन तरुणींनी खिडकीतून उड्या मारल्या, VIDEO व्हायरल

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेश पोलिसांनी एका हॉटेलवर धाड टाकत वेश्या व्यवसाय करणाऱ्या ६ महिलांना रंगेहाथ पकडले. यामधील २ रशियन मुलींनी खिडकीतून उडी मारून पळ काढला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Shocking: हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय, पोलिसांच्या धाडीत ४ जणी सापडल्या; २ रशियन तरुणींनी खिडकीतून उड्या मारल्या, VIDEO व्हायरल
Uttar Pradesh CrimeSaam Tv
Published On

उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. OYO हॉटेलवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे कळताच पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली. यावेळी चार खोल्यांमधून महिलांना रंगेहाथ पकडलं. तर २ रशियन तरुणींनी खिडकीतून उड्या मारून पळ काढला. पोलिसांनी अटक केलेल्या ४ तरुणी या दिल्ली आणि पश्चिम बंगालच्या असल्याची माहती समोर आली आहे. या महिला देहविक्री करत असल्याचे तपासातून उघड झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी वाराणसी शहरातील एका हॉटेलवर ही धाड टाकली. घटनास्थळावरून पोलिसांनी आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या. या हॉटेलवर गेल्या अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता. या ठिकाणी देशभरासह परदेशातील महिलांना आणून ग्राहकांना दिले जात होते. या वेश्या व्यवसायाबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यावेळी चार महिला आढळून आल्या.

Shocking: हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय, पोलिसांच्या धाडीत ४ जणी सापडल्या; २ रशियन तरुणींनी खिडकीतून उड्या मारल्या, VIDEO व्हायरल
Shocking: हॉटेलवर पोलिसांची धाड, घाबरूुून नग्नावस्थेत धावली तरुणी, पहिल्या मजल्यावरून खाली पडली अन्...

अटक केलेल्या महिलांची पोलिसांनी चौकशी केली. यावेळी त्यांनी एका ट्रॅव्हल एजंटने आपल्या आमिष दाखवत वाराणसीला आणून इथे ग्राहकांना भेटण्यास भाग पाडले होते असे सांगितले. पोलिसांनी या महिलांना रंगेहाथ पकडले. तर दोन रशियन महिलांना खिडक्यातून उडी मारून पळ काढला. पोलिसांनी हॉटेलमधून मोबाईल, जायरी आणि विविध गुन्हेगारी साहित्य जप्त केले. हे हॉटेल ओयो रूम्सच्या बॅनरखाली चालवले जात होते आणि या ठिकाणी बेकायदेशीर कामे केली जात होती अशी माहिती तपासातून उघड झाली आहे.

Shocking: हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय, पोलिसांच्या धाडीत ४ जणी सापडल्या; २ रशियन तरुणींनी खिडकीतून उड्या मारल्या, VIDEO व्हायरल
Shocking: रिलच्या नादात ट्रेनची धडक, फुटबॉलसारखा उडाला; तरूणाचा जागीच मृत्यू, VIDEO व्हायरल

या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये दसमीत सिंग, अमन राय, पीयूष जयस्वाल, उमेश यादव आणि शिवम शर्मा यांचा समावेश आहे. पोलिसांना या हॉटेलवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या त्यानंतर धाड टाकत ४ महिलांना अटक केली. या सर्व महिलांची पोलिस चौकशी करत आहेत. या वेश्या रॅकेटमध्ये आणखी कोण-कोण सहभागी आहेत याचा तपास पोलिस करत आहेत.

Shocking: हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय, पोलिसांच्या धाडीत ४ जणी सापडल्या; २ रशियन तरुणींनी खिडकीतून उड्या मारल्या, VIDEO व्हायरल
Shocking : भाच्यानं केली मामाची हत्या, कल्याणमध्ये खळबळ, धक्कदायक कारण समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com