Shocking: रिलच्या नादात ट्रेनची धडक, फुटबॉलसारखा उडाला; तरूणाचा जागीच मृत्यू, VIDEO व्हायरल

Buldhana News: बुलडाण्यात रिलच्या नादात तरुणाने जीव गमावल्याची घटना घडली. रील बनवण्यासाठी रेल्वे रूळावर उभा राहिला तेवढ्यात धावत्या ट्रेनने तरुणाला धडक दिली. या अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
Shocking: रिलच्या नादात ट्रेनची धडक, फुटबॉलसारखा उडाला;  तरूणाचा जागीच मृत्यू, VIDEO व्हायरल
Buldhana News Saam Tv
Published On

Summary -

  • बुलडाण्यात रील नादात तरुणाने गमावला जीव

  • ट्रेनने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

  • अपघातात तरुणाचा मित्र गंभीर जखमी

  • अपघाताचा व्हिडीओ होतोय व्हायरल

संजय जाधव, बुलडाणा

रिलच्या नादात एका तरुणाने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यातून समोर आली आहे. रेल्वे रूळावर उभं राहून रील बनवताना धावत्या ट्रेनने तरुणाला धडक दिली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. या तरुणाला ट्रेनने धडक देत असतानाचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. नातेवाईकाच्या लग्नाला आले असता ही घटना घडली. या घटनेमुळे बुलडाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे लाईनवर उभं राहून रील बनवताना एका तरुणाचा ट्रेनचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शेगावजवळील आळसना रेल्वे स्थानकाजवळ घडली. तर रील बनवताना त्याच्यासोबत असलेल्या त्याचा मित्र गंभीर झाल्याची झाला. शेख नदीम शेख रफिक असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील रहिवासी आहे.

Shocking: रिलच्या नादात ट्रेनची धडक, फुटबॉलसारखा उडाला;  तरूणाचा जागीच मृत्यू, VIDEO व्हायरल
Crime : हत्येचा Live Video! १२ सेकंदात झाडल्या ३ गोळ्या, बाईकवरुन पळताना Reel सुद्धा बनवली

गुरूवारी आळसना गावात लग्नाच्या रिसेप्शनसाठी हा युवक आला होता. त्यावेळी पाचच्या दरम्यान गावाजवळ असलेल्या रेल्वे लाईनवर रील बनवण्याचा मोह या तरुणाला झाला. रील बनवण्यासाठी तो मित्रासह रेल्वे लाईनवर गेला. दरम्यान रील बनवण्यात मग्न असताना आणि कानात हेडफोन लावलेला असताना रेल्वे आल्याचे शेख नदीमला कळालं नाही. अशातच तो रेल्वेच्या खाली आल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

Shocking: रिलच्या नादात ट्रेनची धडक, फुटबॉलसारखा उडाला;  तरूणाचा जागीच मृत्यू, VIDEO व्हायरल
Diwali Gift Reel: सोनपापडी नाही! दिवाळीला असं गिफ्ट दिलं की लोकांनी विचारलं व्हॅकेन्सी आहे का? व्हिडिओ व्हायरल

दुसरीकडे रील बनवताना त्याठिकाणी असलेल्या नदीमचा मित्रसुद्धा गंभीर जखमी झाला आहे. या जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. गेल्याच आठवड्यात जळगाव जिल्ह्यातही रेल्वे लाईनवर रील बनवताना दोन युवकांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच बुलडाण्यात देखील अशीच घटना घडली. त्यामुळे रील बनवताना धोकादायक ठिकाणी जाऊ नका असे आवाहन केले जात आहे.

Shocking: रिलच्या नादात ट्रेनची धडक, फुटबॉलसारखा उडाला;  तरूणाचा जागीच मृत्यू, VIDEO व्हायरल
Reel Stunt Alert : रिलस्टारला खाकीचा दणका! बाईकवर स्टंटबाजी करणं आलं अंगलट, २२ हजारांचा दंड वसूल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com