

पवईत ओलीस ठेवलेल्या १७ लहान मुलांना आरोपीच्या तावडीतून सोडवलं
आरोपी रोहित आर्य याने स्टुडिओच्या बाथरूममध्ये ओलिस ठेवलं होतं
पोलिसांनी मोठ्या शर्थीने ही मुलांना सुरक्षितपणे सोडवलं
मुंबईच्या पवईतील १७ लहान मुलांना ओलिस ठेवलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोठ्या शर्थीने १७ ओलीस मुलांना आरोपी रोहित आर्यच्या तावडीतून सोडवलं. मुंबई पोलिसांनी आरोपी रोहित आर्यच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत. पोलिसांनी आर ए स्टुडिओच्या बाथरुममधून शिरून १७ मुलांची सुटका केली. या घटनेचा संपूर्ण थरार पोलिसांनी सांगितला आहे.
पवईतील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आम्हाला १.४५ वाजता पोलिस स्टेशनमध्ये एका व्यक्तीचा फोन आला. एका व्यक्तीने पवईमधील महावीर क्लासिक नावाच्या इमारतीत काही लहान मुलांना डांबून ठेवले. त्यानंतर आम्ही स्पेशल पथकाने आरोपीसोबत चर्चा केली. पवई पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी बाथरूममधून फोर्स एन्ट्री करून एका व्यक्तीच्या साहाय्याने मुलाची सुटका केली. आतमध्ये १७ मुलं, एक वयोवृद्ध व्यक्ती आणि एका नागरिकांची सुटका करण्यात आली'.
'आरोपीकडे एअरगन दिसतेय. आम्ही सर्च ऑपरेशन करत आहोत. संपूर्ण चौकशीनंतरच सर्वकाही समोर येईल. आरोपीचं बॅकग्राऊंड, मागण्या याचा तपास आम्ही करत आहोत, असेही त्यांनी सांगितलं.
'रोहित आर्य असं ओलीस ठेवणाऱ्याचे नाव आहे. वेब सिरिजच्या ऑडिशनसाठी मुलांना बोलवलं होतं. त्यासाठी हॉल भाड्यावर घेतला होता. मुलं ऑडिशनला आले, त्याच मुलांना त्याने ओलीस ठेवलं होतं. मुलांना ओलीस का ठेवलं? त्या कारणाचा शोध आम्ही घेत आहोत, असेही पोलिसांनी सांगितलं.
आरोपी रोहित याने सरकारसाठी विविध प्रोजेक्ट्समध्ये पैसे लावले होते. त्याने प्रोजेक्ट्समध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली होती. त्यात त्याचं नुकसान झालं होतं. त्यासाठी तो सरकार आणि संबंधित विभागाला जबाबदार धरत होता. त्याने सरकारशी संवाद साधणे आणि बाजू मांडण्यासाठी धोकादायक पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.