Wife Brutally Kills Madrasa Teacher Husband
Wife Brutally Kills Madrasa Teacher HusbandSaam Tv

डोक्यावर रॉडने वार, गळाही चिरला, भींतीवर रक्ताचे थारोळे; मदरशातील शिक्षकाला बायकोनेच संपवलं

Wife Brutally Kills Madrasa Teacher Husband: पत्नीनं पतीला संपवलं. लोखंडी रॉडनं मदरशा शिक्षकावर प्राणघातक हल्ला. पोलिसांनी आरोपी पत्नीला पकडलं.
Published on
Summary
  • पत्नीनं पतीची हत्या केली.

  • लोखंडी रॉडनं नवऱ्याला संपवलं.

  • पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.

उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नीनं मदरशातील शिक्षक पतीची निर्घृण हत्या केली. आधी रॉडने डोक्यावर वार केले. नंतर धारदार शस्त्राने गळा चिरला. चेहरा आणि छातीवरही वार केले. या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला तपास करून अटक केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

दानिश रजा (वय वर्ष ४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते फरोग - ए - उर्दू मदरशात शिक्षक होते. तर, रूबीना असं आरोपी पत्नीचं नाव आहे. दोघांना दोन मुले आहेत. सतत होणारी भांडणं आणि पतीच्या मारहाणीला कंटाळून तिनं पतीला संपवलं असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री दानिश झोपेत असताना रूबीनानं प्रथम लोखंडी रॉडनं त्याच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर चाकूनं गळा चिरून त्याला ठार केलं.

Wife Brutally Kills Madrasa Teacher Husband
कंपनी मॅनेजरच्या मृत्यूचं गूढ वाढलं; हत्येचा संशय? पत्नीच्या कॉल डिटेल्सवर पोलिसांचे लक्ष

शेजाऱ्यांना सकाळी घरातून आवाज आला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा उघडला. समोरचं दृष्य पाहून पोलिसांना धक्का बसला. पलंगावर दानिश रदा यांचा रक्तानं माखलेला मृतदेह होता. डोके, गळा, चेहरा आणि छातीवर गंभीर जखमा होत्या. इतकंच नाही तर, घरांच्या भींतीवरही रक्ताचे डाग पसरले होते.

Wife Brutally Kills Madrasa Teacher Husband
'तुमचे VIDEO थिएटरमध्ये लावू'; भाजपच्या बड्या नेत्याला थेट इशारा, शिंदे गटाचे खासदार आक्रमक, नेमकं कारण काय?

सुरूवातीला दानिशच्या कुटुंबियांनी मौन बाळगलं. मात्र, पोलिसांच्या चौकशीत अखेर पत्नी रूबीनानं गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी महिलेनं सांगितलं की, पती नेहमी भांडत होता. तसेच मारहाण करायचा. घटनेच्या आदल्या दिवशीही पतीनं पत्नीला मारहाण केली होती. यामुळे संतापलेल्या रूबीनानं पतीला संपवायचं ठरवलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com