कंपनी मॅनेजरच्या मृत्यूचं गूढ वाढलं; हत्येचा संशय? पत्नीच्या कॉल डिटेल्सवर पोलिसांचे लक्ष

Company Manager Found Dead Under Suspicious: ग्रेटर नोएडामध्ये कंपनी मॅनेजर यांचा संश्यास्पद मृत्यू. परिसरात खळबळ. सोसायटीतील रहिवाशांनी हत्येचा संशय केला व्यक्त.
Company Manager Found Dead Under Suspicious
Company Manager Found Dead Under SuspiciousSaam Tv
Published On
Summary
  • ग्रेटर नोएडामधील भयंकर घटना.

  • कंपनी मॅनेजरचा संशयास्पद मृतदेह आढळला.

  • पत्नीचे कॉल्स डिटेल्सची तपासणी सुरू.

ग्रेटर नोएडामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कंपनी मॅनेजरचा शुक्रवारी रात्री संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळला आहे. रहिवाशांना हत्येचा संशय आहे. पोलिसांना या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस मृताच्या पत्नीच्या कॉल डिटेल्सची तपासणी करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

सूरजपूर कोतवाली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आशिष गुप्ता (वय वर्ष ४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते आपली पत्नी दिशा गुप्ता यांच्यासोबत पॅरामाउंट सोसायटीमध्ये राहत होते. ते नोए़डाच्या एका कंपनीत मॅनेजर होते. या जोडप्याला मुले नाहीत. शुक्रवारी दुपारी साडेचारच्यादरम्यान, आशिष गुप्ता यांची तब्येत खालावली असल्याची माहिती मिळाली.

Company Manager Found Dead Under Suspicious
'ज्याने वडिलांना सुपरस्टार बनवलं, त्यावरच तुम्ही टीका करताय'.. SRKच्या मुलावर अभिनेता भडकला, वाचा नेमकं काय म्हणाला?

यानंतर थेट मृत्यूची बातमी पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. पोलीस सध्या आशिष गुप्ता यांच्या पत्नीची चौकशी करीत आहेत. त्यांचे कॉल डिटेल्स तपासात आहेत.

आशिषच्या पत्नीनं सांगितलं की, तिचा पती आजारी पडला होता. त्यांना उलट्यांचा त्रास झाला होता. यादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. सोसायटीतील रहिवाशांचा दावा आहे की, आशिष गुप्ताची हत्या करण्यात आली आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Company Manager Found Dead Under Suspicious
पैशांचं प्रलोभन, वेश्यांना हॉटेलच्या खोलीत बोलवायचे अन् दोघं मिळून... अखेर दोघांचा 'असा' झाला भंडाफोड

सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेजही पोलीस तपासात आहेत. आशिष गुप्ताच्या घरी कुणी आले होते का? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. मृत आशिष आणि त्यांच्या पत्नीचे कॉल डिटेल्सही तपासले जात आहे. पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com