
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित.
कॉमेडियन सुनील पालकडून टीका.
बॉलिवूडची खिल्ली उडवल्याचा आरोप.
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही वेब सिरीज चांगलीच गाजली. ही वेब सिरीज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. या वेब सिरीजला चांगलाच प्रसिसाद मिळतोय. मात्र, विनोदी कलाकार सुनील पाल यांनी या वेबसिरीजवर टीका केली आहे. आर्यनने या वेबसिरीजद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीची खिल्ली उडवून चूक केली आहे, असं सुनील पाल म्हणाले.
सुनील पाल यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'तुम्ही त्याच बॉलिवूड इंडस्ट्रीची टीका करत आहात, ज्याने तुमच्या वडिलांना इतका मोठा सुपरस्टार बनवलं आहे', असं सुनील पाल म्हणाले.
शाहरूख खानची खिल्ली उडवली
अभिनेता शाहरूख खानची बॉलिवूडमध्ये ३३ वर्षांची कारकिर्द आहे. या काळात बॉलिवूडच्या बादशाहने अनेक सुपरहिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले. आर्यन खान दिग्दर्शित 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सिरीजमध्ये शाहरूख खानचा कॅमिओ देखील आहे. यात अनेक बॉलिवूड सहकाऱ्यांची खिल्ली उडवली जाते.
दरम्यान, यात सहभागी असलेल्या कोणत्याही कलाकाराने यावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही. सुनील पाल यांना वेब सिरीजमधील काही डायलॉग्स खटकले. सुनील पाल म्हणाले, 'आर्यनकडे प्रसिद्धी, पैसा आहे. तसेच त्याच्याकडे स्टेज देखील आहे. तो नवीन काहीतरी नवीन तयार करू शकला असता. त्याच्या कलाकृतीचे कदाचित संजय लीला भन्साळींनी कौतुक केले असते', असं सुनील पाल म्हणाले.
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील कलाकार
या वेब सिरीजमध्ये करण जोहर, इमरान हाश्मी, सलमान खान, शाहरूख खान यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्स कॅमिओ भूमिकेत दिसले आहेत. हा शो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.